web-ads-yml-728x90

Breaking News

खेर्डीमधील युवकांचा संतोष नलावडेंच्या नेतृत्वात मनसेत जाहीर प्रवेश


BY - संतोष पिलके,युवा महाराष्ट्र लाइव- चिपळूण |
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरीत होऊन व मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगरपरिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर, जिल्हा संपर्क अध्यक्ष अनिल खानविलकर ह्यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून तालुकाध्यक्ष संतोष नलावडे ह्यांच्या मार्गदर्शनाखाली खेर्डी येथील युवा सामाजिक कार्यकर्ते रणजित आवले,अल्ताफ बंदरकर,राकेश राऊत,सिद्धेश शिंदे यांनी मनसे पक्षात प्रवेश केला. या वेळी खेर्डीचे महाराष्ट्र सैनिक निखिल झगडे हेदेखील उपस्थित होते. या सर्वांचे मनसे महाराष्ट्र राज्य सरचिटणीस तथा खेड नगर परिषदेचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी पक्षात स्वागत केले. 


No comments