0

BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

गणेशोत्सवाला अवघे काही दिवस शिल्लक असताना कोकणातील चाकरमान्यांना गणपतीसाठी गावाकडे जाण्याबाबत सरकारने कोणतेही निर्णय घेतलेला नाही. केंद्राकडून रेल्वे गाड्यांची मागणी केलेली नाही. ई-पास व इतर वाहतूक सुविधांचा पत्ता नाही. सरकारला कोकणी माणसाची सगळ्या बाजूने कोंडी करायची आहे का,' असा सवाल भाजपचे आमदार अॅड.आशिष शेलार यांनी केला आहे.या समस्यांबाबत शेलार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. चाकरमान्यांना कोकणात जाण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घ्या. अन्यथा, 'लालबागच्या राजा'च्या भक्तांप्रमाणेच कोकणी माणसाचीही बाप्पाशी ताटातूट होईल, असे शेलार यांनी पत्रात म्हटले आहे. कोकणातील ग्रामपंचायतींनी असा निर्णय घेतला आहे की कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांना 14 दिवस क्वॉरंटाईन करण्यात येईल.गणेशोत्सवाला मोठ्या प्रमाणात चाकरमानी  कोकणात दाखल होणार आहे. अन्न, गरम पाणी, शौचालये व औषधांसाठी ग्रामपंचायतींना सरकारकडून विशेष निधी उपलब्ध करण्यात आलेला नाही. त्याबाबत साधा विचारही करण्यात आला नाही किंवा बैठकही घेण्यात आलेली नाही. सरकारच्या या बेफिकिरीमुळे गावकरी आणि चाकरमानी यांच्यात दरी निर्माण झाली आहे, असा आरोप शेलार यांनी केला आहे.


Post a Comment

 
Top