नंदीनी नामदेव शेलार यांचे फार्मासी मध्ये सुयश तर मिताली नामदेव शेलार,मयुरी मिलींद दळवी यांचे दहावीमध्ये सुयश ; मुलींची बाजी कायमच…
BY - मन्साराम वर्मा, युवा महाराष्ट्र लाइव- ठाणे |
संपुर्ण राज्यात आज दहावी चा निकाल लागला.या
निकालामध्ये विविध जिल्हयातुन अनेक विद्दयार्थ्यांनी सुयश प्राप्त केले आहेत.ठाणे
जिल्हयातून यंदाची बाजी मात्र मुलींचीच प्रभावी ठरली असल्याचे समोर येत आहे.मुरबाड
सारख्या ग्रामीण भागातून नंदीनी नामदेव शेलार या तरूणीचा आज फार्मासीचा निकाल
जाहिर झाला असून त्या निकालात या तरूणीने विजय
संपादन करित प्रथम क्रमांक पटविला आहे,तर
त्यांचीच लहान बहीण मिताली नामदेव शेलार(91.40 टक्के),मयुरी मिलींद दळवी(84टक्के) यांनी दहावीमध्ये सुयश
प्राप्त केले आहे.ग्रामीण भाग आणि शहरी भागात मुलींची बाजी ही प्रभावी असते आणि हे
पुन्हा या एका घरातील बहिणींनी संपुर्ण राज्यासमोर सिध्द केले आहे.या तरूणींची
जिद्द आणि वडिलांची मेहनत तसेच कुटूंबीयांचे संस्कार त्यांच्या यशाचे सार्थक ठरले
आहेत.परिक्षेत घेतलेली खबरदारी त्यांच्या निकालाची सरासरी टक्केवारी जगासमोर येत
असताना त्यांच्या यशाच्या गुरूकिल्लीला श्रेय प्रदान होते म्हणून असे गुरू शिक्षक
ज्यांनी अभ्यासाच्या माध्यमातून विद्दयार्थ्यांना घडविले असे मुरबाड आणि उल्हासनगर
शाळेच्या शिक्षकांचा यात सिंहाचा वाटा महत्वपुर्ण ठरला आहे.यश प्राप्तीसाठी
घेतलेली मेहनत त्यांच्या आर्इवडिलांची मान उंचवणारी ठरवणार्या नंदीनी नामदेव
शेलार,मिताली नामदेव शेलार,मयुरी मिलींद दळवी या तरूणींचे
सर्वत्र ठाणे जिल्हयात अभिनंदन होत आहे.पुढिल शिक्षण देशासाठी,आपल्या मायभुमिसाठी घेणार असल्याचे आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.यशस्वी
शिखर गाठणार्या या एकाच कुटूंबातील तरूणींचे हार्दिक अभिनंदन केले जात असून
त्यांच्या विचारसारणीला नागरिकांनी कौतूकाची थाप मारली आहे.
No comments