0

BY - गोपाल भैय्या चव्हाण,युवा महाराष्ट्र लाइव- गेवराई |
गेवराई तालुक्यामध्ये रात्री धुव्वाधार पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील नद्यांना पाणी आलेले होते. रात्री साडेनऊच्या दरम्यान बालमटाकळी येथील एका मोटारसायकलस्वाराने अमृता नदीच्या पुलावरून वाहत असलेल्या पाण्यातून मोटारसायकल घातली. यात त्याच्यासह त्याच्या सोबत असलेले त्याचे दोन्ही मुले वाहून गेले. यातील  मुलीचा मृतदेह आज सकाळी सापडला तर अन्य दोन मृतदेहांचा शोध नदीच्या कडेने प्रशासनासह नातेवाईक घेत आहेत.
   याबाबत अधिक माहिती अशी की, बालमटाकडी येथील कृष्णा घोरपडे (वय ३५) हे आपला मुलगा (वय ८), मुलगी (वय ५) हे दुचाकीवरून जात असताना पौळाचीवाडी जवळ आल्यानंतर रात्री साडेनऊ वाजता जोरदार पाऊस सुरू झाला या पावसामुळे अमृता नदीला पुर आला. पुलावरून ओसंडून पाणी वाहू लागलेले असताना घोरपडे यांनी वाहत्या पाण्यात मोटारसायकल घातली. या वेळी ते मोटारसायकलसह वाहून गेले. रात्र असल्याने याची कल्पना कुणालाच नव्हती. दरम्यान खळेगाव येथील तीन युवकांनी याच पुलावरून गाडी घातली, त्यांचीही गाडी स्लिप होऊन ते नदीत पडले. मात्र तिघांनाही पोहता येत असल्याने ते गाडी सोडून किनार्‍यावर आले व घरी जाऊन आज सकाळी ते परत आपली गाडी शोधण्यासाठी नदीत उतरले असता त्यांना त्यांची गाडी न सापडता दुसरीच गाडी सापडली. यावरून अन्य लोकही नदीत पडले असल्याची शंका आली. याच दरम्यान घोरपडे यांचे नातेवाईक अमृता नदीच्या पुलाजवळ आले, कारण रात्री साडेनऊ वाजता त्यांच्या घरच्यांना फोन करून सांगितले होते की, मी पौळाचीवाडी जवळ आहे, आता खूप पाऊस पडतोय, असे म्हणून फोन ठेवला होता. त्यानंतर त्यांचा फोन लागलाच नाही. त्यामुळे नातेवाईक त्यांच्या शोधार्थ अमृता नदीच्या पुलाजवळ आले होते. त्यांचा शोधाशोध घेतल्यानंतर ५ वर्षीय मुलीचा मृतदेह दुपारी सापडला. मात्र कृष्णा घोरपडे आणि त्यांच्या मुलाचा मृतदेह प्रशासनासह घोरपडे यांचे नातेवाईक घेत आहेत. या दुर्दैवी घटनेने गेवराई तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात आहे.घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी चकलंबा पोलिस ठाण्याचे  सपोनि. विजयकुमार देशमुख, पीएसआय पवार, पीएसआय झिंझुर्डे यांच्यासह पोलिस कर्मचारी आणि महसूल विभागातील कर्मचार्‍यांनी धाव घेतली.

Post a comment

 
Top