web-ads-yml-728x90

Breaking News

मेट्रोपोलीस लॅब विरोधात बिपीएल प्रमाणपत्र धारकाची फसवणुक केल्याप्रकरणी "अन्याय अत्याचार निर्मुलन समिती, महाराष्ट्र राज्य" संघटनेची पोलिसांत तक्रार...


BY - युवा महाराष्ट्र लाइव - कल्याण |
कल्याण मधिल हॉलीक्रॉस हॉस्पिटल हे कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने कोव्हिड सेंटर म्हणून जाहीर केलेले आहे. येथे कोविड टेस्ट अर्थात (RT-PCR) टेस्ट मेट्रोपोलीस या नामांकित लॅब मार्फत करण्यात येते महापालिकेने त्यांना तशी परवानगी दिली आहे.
सदर ठिकाणी कोविड टेस्ट चे सर्वसामान्य नागरिकांकडून र. रु. २८००/_ घेतले जातात. मात्र दारिद्रय़रेषेखालील नागरिकांना सदरची टेस्ट मोफत असतांना ज्यांचेकडे महानगरपालिकेने दिलेले दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे प्रमाणपत्र आहे अशा नागरिकांकडून देखील पैसे उकळले जातात. त्यांना पैसे भरल्याची पावतीही दिली जात नाही. ही बाब अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य. संघटनेचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र तथा अण्णा पंडित. यांचे निदर्शनास आल्यानंतर त्यांनी हॉलीक्रॉस हॉस्पिटलला प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुका संघटक तथा पत्रकार आदर्श भालेराव, दि शिल्ड संस्थेचे अध्यक्ष आणि मासू संघटनेचे राज्य सहसचिव प्रशांत जाधव, उपसंपादक सुवर्णा कानवडे इत्यादी कार्यकर्त्यांसह भेट दिली असता तेथे मेट्रोपोलीस लॅबचे अथवा महानगर पालिकेचे कोणीही जबाबदार अधिकारी उपस्थित नव्हते. अण्णा पंडीत यांचे सोबत असलेले आदर्श भालेराव यांनी कल्याण डोंबिवली महानगर पालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ कदम यांना फोन करुन BPL प्रमाणपत्र धारकांची आर्थिक लूट केली जात असल्याचे सांगितले.तेंव्हा दारिद्र्य रेषेखालील कुटुंबाचे प्रमाणपत्र असलेल्या नागरिकांकडून कोविड टेस्ट चे पैसे घेणे चुकीचे असल्याची कबुली डॉ.कदम यांनी दिली.
या संदर्भात बीपीएल प्रमाणपत्र धारकांची आर्थिक फसवणुक व दिशाभूल करून त्यांची लुट केली जात असुन तसेच शासकीय नियमांची जाणिवपुर्वक पायमल्ली केली असल्याने "मेट्रोपोलीस लॅब" विरोधात व या मध्ये काही अंशी कडोंमपा ही दोषी असल्याने त्यांचे विरुद्ध फौजदारी स्वरुपाचा गुन्हा नोंदविण्यात यावा अशी तक्रार महात्मा फुले चौक पोलीस ठाणे,कल्याण येथे "अन्याय अत्याचार निर्मुलन समिती महाराष्ट्र राज्य" संघटनेचे प्रदेश सरचिटणीस महेंद्र तथा अण्णा पंडित. यांनी दिली आहे.

No comments