web-ads-yml-728x90

Breaking News

विविध स्वयंसेवी संघटनांच्या वतीने सुनील सकट यांना कोरोना योध्दा सन्मान


BY - युवा महाराष्ट्र लाइव - अहमदनगर |
कोरोना महामारीच्या संकटकाळात सामाजिक भावनेने घेतलेल्या विविध सामाजिक उपक्रमांची दखल घेत सामाजिक कार्यकर्ते तथा लहूजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष सुनील सकट यांना विविध स्वयंसेवी संघटनांच्या   वतीने कोरोना योध्दे म्हणून गौरविण्यात आले.
सुनिल सकट यांनी कोरोनाच्या संकटकाळात गरजूंना अन्न-धान्य, मास्क व सॅनीटायझरचे वाटप केले. तसेच कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जनजागृती केली. या कार्याची दखल घेत महाराष्ट्र मुस्लीम महासंघ, भारत प्रभात पार्टी, शौर्य मराठी, परशुराम सेवा संघ, बागवान विकास फाऊंडेशन, हिंदवी स्वराज्य युवक संघटनेच्या वतीने त्यांना कोरोना योध्देचे सन्मान पत्र प्रदान करण्यात आले आहे. या गौरवाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. 

No comments