web-ads-yml-728x90

Breaking News

सानिया महाडीक हिचा वाढदिवसानिमित्त अनोखा उपक्रम


BY - महेश मस्कर, युवा महाराष्ट्र लाइव- सातारा |
सातारामध्ये लॉकडाऊनच्या काळात सानिया महाडीक हिचा एक अनोखा उपक्रम पाहायला भेटला.वाढदिवस हा प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यातला विशेष दिवस असतो. संकेत महाडिक तसेच अनुष्का महाडिक यांचा वाढदिवस होता. त्यांच्या वाढदिवसानिमित्त शिवविचार रूजवण्यासोबत एक वैचारीक व जबाबदार पिढी घडविण्यासाठी हाती घेतलेला प्रतिष्ठानच्या "वाचाल तर वाचाल" या महत्वपूर्ण उपक्रमाअंतर्गत पुस्तक भेट म्हणून देण्यात आले. आणि पर्यावरण तसेच वृक्षसंवर्धनासाठी "जन्मदिनी वृक्ष लावू अंगणी" हा उपक्रम राबवताना त्या दोघांना एकएक रोपटे भेट देऊन त्यांच्या हातूनच त्याचे रोपण करून घेतले आणि त्यांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा करण्याचा प्रयत्न सानिया महाडीक हिने केला. शिवविचार घराघरात रुजवण्यास यानिमित्ताने सुरुवात केली.

No comments