web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यात कोरोनामुक्त रुग्णांची संख्या २ लाखांच्या उंबरठ्यावर


BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
राज्यात आज ६४८४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख ९४ हजार २५३ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९८९५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४० हजार ०९२ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या १७ लाख ३७ हजार ७१६ नमुन्यांपैकी ३ लाख ४७ हजार ५०२ नमुने पॉझिटिव्ह (२० टक्के) आले आहेत. राज्यात ८ लाख ७४ हजार २६७ लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४४ हजार २२२ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. राज्यात आज २९८ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ३.७ टक्के एवढा आहे.राज्यात नोंद झालेले  २९८ मृत्यू हे मुंबई मनपा-५५, ठाणे-७, ठाणे मनपा-१, नवी मुंबई मनपा-७,कल्याण-डोंबिवली मनपा-१८, उल्हासनगर मनपा-८, भिवंडी निजामपूर मनपा-४, मीरा-भाईंदर-२, वसई-विरार मनपा-२३, पालघर-२,रायगड-३, नाशिक-५, नाशिक मनपा-८, मालेगाव मनपा-२, अहमदनगर-१, धुळे मनपा-२, जळगाव-८, जळगाव मनपा-५, पुणे-१९, पुणे मनपा-३७, पिंपरी-चिंचवड मनपा-२२,सोलापूर-१, सोलापूर मनपा-२, सातारा-१, कोल्हापूर-३, कोल्हापूर मनपा-१, सांगली-२, सांगली मिरज कुपवाड मनपा-३, रत्नागिरी-२, औरंगाबाद मनपा-१०, जालना-३, हिंगोली-४, परभणी मनपा-१, लातूर-५, लातूर मनपा-१, उस्मानाबाद-१, बीड-३, नांदेड मनपा-४, अकोला-१, अमरावती मनपा-२,यवतमाळ-२,  नागपूर मनपा-१, या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य ६ अशी नोंद आहे.

No comments