web-ads-yml-728x90

Breaking News

आरोग्य अधिकारी गुंतले कोरोनाच्या आकडयात ; कोरोनाच्या नावाखाली बोगस डॉक्टरांची दुकाने खुल्ले


BY - गौरव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव- मुंबर्इ |
वेळोवेळी अनेक विषयांचा मागोवा घेणारी युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीने अनेक विषय शासनाच्या निदर्शनास आणून दिल्या आहे त्यापैकी काही महिण्यांपैकी बोगस डॉक्टरांचा मुद्दा हा उचलून घेतला होता.अलीकडे कोरोना आला आणि तक्रार अधिकारी वर्गांनी गिळली.चौकशी अंतिम कोरोनाचा जो थैमान सुरू झाला त्यातच आरोग्य अधिकारी हा कोरोनाचा आकडयात गुंतला त्यातच बोगस डॉक्टरांचा विषय तसाच राहिल्याने काही लोकांनी आमच्याशी संपर्क साधून आपण डॉक्टरांच्या चौकशीचे काय केलं असे विचारणा करून त्याचा आपण पुन्हा पाठपुरावा करावा अशी विनंती केली.त्यांची विनंती विचारात घेता बोगस डॉक्टरांविषयी आमच्या वृत्तवाहिनीने पुन्हा चौकशी करण्यासाठी थेट मुख्यमंत्री यांच्याकडे मागणी केली आहे.खरे डॉक्टर कोरोना योध्दा असून खोटे बोगस डॉक्टर जो धंदा करू लागला आहे त्यामध्ये वरिष्ठ अधिकार्यांनीही त्या बोगस डॉक्टराला कोरोना योध्दा म्हणून पदवी बहाल केली आहे.आयुष्यभर तर कोरोना कोरोना करू शकत नाही आणि तक्रारीतून त्यांना वाचविता येणार नाही हे तर सत्यच आहे परंतू कोरोना पार्श्वभुमीवर नागरिकांची लूट जी केली जात आहे त्यालाही लगाम लावणे शासनाची जबाबदारी आणि नागरिकांसाठी खबरदारी आहे.
     ठाणे जिल्हयातील मुरबाड तालुक्यात काही महिण्यांपुर्वी बोगस डॉक्टरांविषयी चौकशी करून कारवार्इ करण्याचे आदेश जिल्हाधिकारी तसेच जिल्हापरिषदेकडून देण्यात आले होते परंतु तालुका कमिटी अधिकारी वर्गांनी त्याकडे पाठ फिरवली आणि बोगस डॉक्टरांच्या चौकशीवर कोरोनाचे सावट बसविले.तक्रारदाराच्या अर्जाला जिल्हा वरिष्ठ अधिकारी जुमानत नाही.साटे लोटे मोठे असल्याने बोगस डिग्रीवाल्यांनाही मोठ मोठे कारखाने ठेके दिले जाते.काही डॉक्टरांना तर खालपासून वर पर्यंत डॉक्टरांना पोहोसावे लागत असल्याने जाहिरपणे नागरिकांची लूट केली जात असून अधिकारी वर्गांनी डोळयावर काळी पट्टी बांधली आहे आणि मुक गिळून स्तब्ध झाले आहेत.भरमसाठपने बिल आकारून नामवंत अशा डिग्रीधारक डॉक्टरांच्या पाटया लावल्या जातात परंतू वेळेवर डॉक्टर उपचार अभावी उपलब्ध नसतो.काही ठिकाणी तर एन.सी.तक्रारीवर कलमाची हेराफेरी करून एखाद्दयाकडून हजारो,लाखो रूपये घेऊन विरोधी व्यक्तीवर केस होर्इल या दृष्टीने गोरगरिबांना अडकविले जाते याकडे लक्ष काही दिले जात नाही.शासनाच्या पगारा व्यतिरिक्त वरकमार्इ कमविणार्या डॉक्टरांनी आपला थाट मुरबाडमध्ये घातल्याने याची साखळी मोठी असल्याचे बोलले जात आहे.काही ठिकाणी आपल्या वृत्तवाहिनीने अशा बाबीकडे लक्ष लागून राहिल्याने सढळ पुरावा भेटल्यास लाखो जनसामान्यांसमोर पोलखोल केला जाणार आहे.आज हा डॉक्टर इथं तर दुपारी त्या खाजगी डॉक्टराकडे परत रात्री तिसर्या डॉक्टराकडे नागरिकांच्या लुटीसाठी असतोच.याकडे अधिकारी वर्गानी दुर्लक्ष केले असून त्याचा फायदा मात्र डॉक्टर वर्गांनी घेतला आहे.गर्भवती महिलांच्या प्रसुतीचा विषयही तितकाच गंभीर असून नॉरमली प्रसुती असताना पैशाच्या आहारी जाऊन सिर्जरींग प्रसुती केली जात असल्याचे नागरिकांमध्ये बोलले जात आहे.महिला डॉक्टर मुरबाड ग्रामीण रूग्णालयात प्रसुती साठी नसल्याने आजही मुरबाड ग्रामीण रूग्णालयात पद रिक्तच आहे असे समजून येत आहे.मुरबाड ग्रामीण रूग्णालयात महिलांची प्रसुती केली जाते तिथं महिला डॉक्टर हवे अशी मागणी मुरबाड विकासमंचच्या अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ शेलार यांनी भाजप काळात आरोग्यमंत्री दिपक सावंत यांच्याकडे केली होती त्या मागणीची दखलही घेतली होती परंतू कालांतराने महिला डॉक्टर पुन्हा मुरबाडला दिसलेच नाही त्यामुळे आजही महिला डॉक्टर महिलांच्या प्रसुतीसाठी महिलावर्ग वाट पाहत आहेत.तर उल्हासनगरमध्ये डॉक्टरच मनमानी करत असून नागरिकांची लूट करून कोरोनाची भिती दाखवून  कोरोना चाचणीतून पैसा कमवित आहेत.हाताच्या एक्सरे,व महिला पुरूषांच्या सोनोग्राफी,सिटीस्कॅनसाठी प्रथम कोरोना चाचणी करून  येण्यास सांगत असून हा निव्वळ धंदा सुरू केला आहे.800 रूपयाच्या सोनोग्राफी,आणि एक्सरे साठी मिळत नाही तिथं लॉकडाऊनमध्ये 5 हजार आणायचे कुठून ? असा प्रश्न जनतेसमोर पडल्याने पैशा अभावी तो आपली साधी सोनोग्राफीही काढू शकत नाही.कोरोनाच्या नावाखाली हा नवा धंदा सुरू असून शासनानी याकडे लक्ष देण्यासही आता नकार केला आहे.अहो सरकार मरेल ना तो बिगर कोरोनाचालक्ष घाला आणि  धंदा थांबवा अशी मागणी जोर धरत आहे.तर दुसरीकडे मुरबाड तालुक्यात बोगस डॉक्टरांचा धंदा तेजीत असताना आरोग्य अधिकारी शो शार्इनिंग करत असल्याचे कळून येत आहे.याकडे मुख्यमंत्री व जिल्हाधिकारी ठाणे,लोकप्रतिनिधी यांनी लक्ष वेधावे अशी मागणी मुरबाड विकासमंचच्या अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ शेलार यांनी केली आहे.

No comments