web-ads-yml-728x90

Breaking News

माणसातला माणूस हरपला ; समाजसवेक मारूती शंकर भोर्इर यांचे निधन


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव- भिवंडी |
जगाच्या पाठीवर आणि माणूसकीच्या झरीवर अवतरणारा माणूस ज्यांनी स्वतःच्या विचाराअगोदर जनसामान्यांचे हित पाहिले असे देवमाणूस कमी प्रमाणात आपल्याला दिसतात असाच देवमाणूस जो आज आपल्यात नाही.भिवंडी तालुक्यातील आतकोली गावातील मारूती शंकर भोर्इर ज्यांनी खर्‍या अर्थाने गावाच्या विकासाठी विकासाचा पाया रचला.लोकांच्या सेवेसी एका हाकेला धाऊन जाणारे आणि वेळ प्रसंगी मदतीचा हाथ देणारे मारूती शंकर भोर्इर यांचे निधन झाले.त्यांच्या निधनाची बातमी कळताच संपुर्ण भिवंडी परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.त्यांच्या जीवनाच्या वाटचालीत त्यानी माणूसकी कमविली त्यामध्ये त्यांचे ज्येष्ठ बंधू पंचायत समिती सदस्य तथा माजी उपसभापती प्रकाश भोर्इर यांच्यासमवेत विकासाची कामे केली.त्यांची मुले उद्योगपती दिनेश भोईर,भादाणे ग्रा.प.चे माजी सरपंच रविंद्र भोईर,व विद्यमान उपसरपंच  प्रदिप मारुती भोईर,प्रशांत भोईर यांच्यावर चांगल्या संस्काराची सवाली मिळाली.कै.मारूती भोर्इर हे जे काम हातात घ्यायचे ते पुर्ण करायचे त्यांच्या समोर कधी जात,पात,पक्ष उभा राहिला नाही त्यामुळे असा देवमाणूस जो निस्वार्थीमनाचा आणि लोकांसाठी झटणारा आज आपल्यात नाही हे कळताच सर्वत्र गावागावातून तालुक्यात दुखः व्यक्त होत आहे.त्यांच्या पश्‍च्यात त्यांचे मुलगे,सुना,नातवंडे आहेत.

No comments