0

BY - युवा महाराष्ट्र लाइव- सोलापूर |
देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी सोलापूर शहराने ब्रिटीशांना मात देऊन काही दिवस स्वातंत्र्य मिळविले होते. अशा लढवय्या शहरातील लोक हे निश्चितपणे कोरोनावरही मात करतील, असा विश्वास खासदार शरद पवार यांनी व्यक्त केला.सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन कार्यालयाच्या सभागृहात कोरोना उपाययोजनाबाबत आढावा  बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महापौर श्रीकांचना यन्नम, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, खासदार ओमराजे निंबाळकर उपस्थित होते.श्री. पवार म्हणाले, जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी तुम्ही लोकांच्या प्रश्नात लक्ष घाला, आम्ही तुमचे प्रश्न सोडवू. राज्य शासन आणि केंद्र सरकार यांच्याकडून आवश्यक असणारी सर्व मदत करण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जातील.शहरातील महानगरपालिकेच्या आर्थिक आणि मनुष्यबळविषयक मागण्यांबाबत मुख्यमंत्री, अर्थमंत्री आणि आरोग्यमंत्री यांच्याशी एकत्रित बैठक घेऊन तोडगा काढला जाईल. यासाठी मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता पुढील आठवड्यात सोलापूरचा दौरा करून एक व्यापक अहवाल सादर करतील, असेही त्यांनी सांगितले.


Post a comment

 
Top