web-ads-yml-728x90

Breaking News

तपासणीला सहकार्य न करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करा – पालकमंत्री


BY - युवा महाराष्ट्र लाइव – अकोला |
कोरोनाचा फैलाव आता बाळापूर, अकोट या सारख्या शहरात वाढत आहे. या ठिकाणी संदिग्ध व जोखमीच्या व्यक्तिंचे सर्वेक्षण करण्यात आले असून या सर्व लोकांनी कोरोना चाचणीसाठी स्वॅब देणे आवश्यक आहे. मात्र त्यासाठी लोक सहकार्य करत नाही असे निदर्शनास आले आहे. तेव्हा, तपासणीसाठी जे लोक सहकार्य करणार नाहीत अशा लोकांविरुद्ध कायदेशीर कारवाई करा मात्र सगळ्यांच्या चाचण्या पूर्ण करा, असे निर्देश राज्याचे जलसंपदा व लाभक्षेत्र विकास राज्यमंत्री  तथा जिल्ह्याचे पालकमंत्री ना. ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांनी आज जिल्हा प्रशासनाला दिले.पालकमंत्री ना. बच्चू कडू यांनी आज कोरोना संसर्गाच्या सद्यस्थितीबाबत आढावा बैठक घेतली. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर, जिल्हा परिषदेचे मुख्य  कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, मनपा आयुक्त संजय कापडणीस, अपर जिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर,  शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. कुसुमाकर घोरपडे,  जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश आसोले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजकुमार चव्हाण, निवासी उपजिल्हाधिकारी संजय खडसे, उपविभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार आदी उपस्थित होते.यावेळी जिल्ह्यातील  कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत माहिती सादर करण्यात आली. त्यानुसार येत्या काळात जिल्ह्यात दाखल होणाऱ्या रॅपिड टेस्ट किटच्या सहाय्याने करावयाच्या चाचण्यांचे नियोजन करा, असे निर्देश ना. कडू यांनी दिले.  प्रतिबंधित क्षेत्राचा बंदोबस्त हा अधिक कडक असला पाहिजे.  या क्षेत्राच्या बाहेरुन  आत व आतून बाहेर ये जा करता कामा नये. जोखमीचे व अन्य व्याधींनीग्रस्त लोकांच्या चाचण्या पूर्ण करा. सर्वेक्षणाअंती  ज्या ज्या लोकांच्या चाचण्या करणे आवश्यक आहे असे वाटते त्यांच्या चाचण्या करा.  अकोट, बाळापूर येथे संदिग्ध व्यक्तींच्या तपासण्या पूर्ण करा. अशा ठिकाणी लोकांच्यामनात असलेली भिती दूर करण्याचा प्रयत्न करा.  मात्र तरीही तपासणीसाठी सहकार्य न केल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करा, असे निर्देश ना. कडू यांनी यावेळी दिले.

No comments