web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यात शेतकऱ्यांना बि-बियाणे व खते कमी पडू देणार नाही – कृषिमंत्री दादाजी भुसे

BY -  युवा महाराष्ट्र लाइव – गडचिरोली |
राज्यातील खरीप व रब्बी हंगामादरम्यान कोणत्याही शेतकऱ्याला आवश्यक बि-बियाणे व खते कमी पडू देणार नाही असा विश्वास राज्याचे कृषिमंत्री दादाजी भुसे यांनी गडचिरोली येथे राज्यातील सर्व शेतकऱ्यांना दिला. वडसा तालुक्यातील नैनपूर येथे कृषी संजीवनी सप्ताहानिमित्त शेतकऱ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते.स्व.वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन प्रत्यक्ष बांधावर जाऊन, कृषी विषयक तंत्रज्ञानाचा प्रसार व प्रचार होण्यासाठी कृषी संजीवनी सप्ताह संपूर्ण महाराष्ट्रात राबविला जात आहे. त्यानिमित्त आज श्री. भुसे यांच्या उपस्थितीत शेतकरी संवाद कार्यक्रमाचे आयोजन नैनपूर येथे करण्यात आले होते. जिल्ह्यातील नैनपूर गावाचे शेतकरी गजेंद्र ठाकरे यांच्या शेतावर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गजेंद्र ठाकरे यांचा सपत्नीक सत्कार मंत्री श्री. भुसे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी मंत्री महोदयांनी श्री. ठाकरे यांचे कौतुक करून या प्रकारे शेकडो शेतकरी तयार व्हावेत यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना कृषी विभागाला दिल्या. यावेळी आरमोरी मतदार संघाचे आमदार कृष्णाजी गजबे, भंडारा येथील आमदार नरेंद्र भोंडेकर, वडसा नगराध्यक्षा शालुताई दंडवते, विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र भोसले, माजी आमदार मडावी, आनंदराव गेडाम, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, डॉ.कराडे, प्रकल्प संचालक आत्मा गडचिरोली तानाजी खर्डे विभागीय कृषी अधिकारी वडसा, विशाल मेश्राम उपविभागीय अधिकारी वडसा, दिशांत कोळप कृषी विकास अधिकारी गडचिरोली, निलेश गेडाम तालुका कृषी अधिकारी उपस्थित होते.

No comments