web-ads-yml-728x90

Breaking News

शेती लागवडीची धामधूम सुरू परंतू त्यांच्या समस्यांना शासननी जाणून घ्यावे


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड, ठाणे |
मुरबाड तालुक्यात शेतकरी बांधव हा सुखावला असताना अलीकडै पावसाने दमदार हजेरी लावल्याने शेतकरी आनंदी व्याकुळ झाला आहे त्यातच शेती लावणीला सुरूवात झाली असून मोठया आनंदाने शेतकरी वर्ग हा शेतात उतरून शेतीची लावणी करताना दिसत आहे.कोरोनाची भिती ही अजूनही असून शेतकरी मात्र त्या भिती सावटाखालीच यंदाची शेती कसत आहे.दरवर्षीप्रमाणे यंदाची शेती लागवड ही धाडसाची म्हणावी लागणार आहे.काही शेतकरी बांधवांना बि बियाणे हे मिळाले नसून कर्जबाजारी त्यात अजून कर्जाचा डोंगर आणि बाहेरून खाजगी ठिकाणाहून बियाणांची खरेदी त्यात माणसं कोरोनाच्या भितीपोटी येत नाहीत अशातच पावसाची दमदार हजेरी असतानाही शेतकरी मात्र आनंदात असूनही  शेती कसून भारत कृषीप्रधान म्हणून सिध्द करू पाहत आहे अशा शेतकरी बांधवांना या कोरोना प्रादुर्भावात  मोठया अडचणी निर्माण होत असल्याने शासनाने शेतकरी बांधवांच्या अडचणी समजून घेऊन त्यांच्या समस्यांना दूर करून त्यांच्या पाठिशी खंबीर उभे राहण्याच्या अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे.

No comments