विरोधकांनो पोटदुखी थांबवा..! लॉकडाऊन हटवून जनतेच्या जीवाची जवाबदारी घेणार का? - उद्धव ठाकरे
BY - मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
मी काम करत नाही, अशा प्रकारे कोण काय बोलते आणि
काय करतोय याच्याशी मला देणे घेणे नाही, मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. जे
बोलताहेत त्यांची माझ्या कामाबाबत पोटदुखी असेल. मात्र, देशातल्याच एका संस्थेने
मी कुठेही न जाता न फिरता, देशातील सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये माझी निवड केली.
ही निवड देखील विरोधकांच्या पोटदुखीचे कारण असू शकते, अशी खोचक टीका मुख्यमंत्री
उद्धव ठाकरे यांनी विरोधी पक्षनेते फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्यावरून केली आहे.लॉकडाऊन
हटवण्यासंदर्भात काही जणांकडून मागणी केली जात आहे, किंवा लॉकडाऊन लागू कऱण्याच्या
निर्णयाला हा काय उपाय आहे का? अर्थव्यवस्था खीळखीळ झाली, अशी टीका विरोधकांसह
काही शहाणे लोक करत आहेत.परंतु अर्थव्यवस्थेच्या संकटाची जाणीव आम्हालाही आहे.
मात्र, समजा मी लॉकडाऊन उघडला त्यानंतर कोरोनाचा संसर्ग वाढून ज्या लोकांचे बळी
जातील, त्यांची जबाबदारी हे लोक घेणार आहेत का? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
यांनी लॉकडाऊनला विरोध करणाऱ्यांना यावेळी केला. त्यामुळे मी परिस्थितीनुरूप
हळूहळू काही गोष्टी सुरु करतोय, एकदा सुरु केलेले पुन्हा बंद करावे लागणार याचीही
काळजी घेतली जातेय, आणि नागरिकांच्या आरोग्यालाही प्राधान्य देण्याचा माझा प्रयत्न
असल्याचे ठाकरे म्हणाले.
No comments