0

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
राज्यातील  52 हजार 437 स्वस्त धान्य दुकानांमधून धान्याचे वितरण सुरळीत सुरु आहे  दि.1 जुलै ते 23 जुलैपर्यंत राज्यातील 1 कोटी 28 लाख 14 हजार 981 शिधापत्रिका धारकांना 32 लाख 20 हजार 768 क्विंटल अन्नधान्याचे वाटप करण्यात आले  असल्याची माहिती अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.राज्यात राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब लाभार्थी असे दोन्ही रेशनकार्डमधील पात्र लाभार्थ्यांची संख्या सुमारे 7 कोटी आहे.  या लाभार्थ्यांना 52 हजार 437 स्वस्त धान्य दुकानांद्वारे सार्वजनिक वितरण व्यवस्थेचा लाभ दिला जातो. राज्यात या योजनेमधून सुमारे 16 लाख 53 हजार 326 क्विंटल गहू, 12 लाख 70 हजार 479 क्विंटल तांदूळ, तर 17 हजार 410 क्विंटल साखरेचे  वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर स्थलांतरित झालेले परंतु लॉकडाऊनमुळे राज्यात  अडकलेल्या सुमारे 2 लाख 94 हजार 81 शिधापत्रिका धारकांनी  ते जेथे राहत आहे त्याठिकाणी शासनाच्या पोर्टबिलीटी यंत्रणेअंतर्गत ऑनलाईन पद्धतीने अन्नधान्य घेतले आहे.प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो (गहू + तांदूळ) मोफत देण्याची योजना आहे. दि. 15 जुलै पासून आतापर्यंत जुलै महिन्यासाठी एकूण 13 लाख 73 हजार 640 रेशनकार्ड ला मोफत (गहू +  तांदूळ) वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 59 लाख 39 हजार 268 लोकसंख्येला 2 लाख 96 हजार 963 क्विंटल गहू आणि तांदळाचे वाटप झाले आहे. प्रधानमंत्री गरीब कल्याण अन्न योजनेअंतर्गत प्रति लाभार्थी प्रति महिना 5 किलो तांदूळ मोफत देण्याची योजना आहे. दि. 6 जून पासून आतापर्यंत जून महिन्यासाठी एकूण 1 कोटी 40 लाख 56 हजार 810 रेशनकार्ड ला मोफत तांदूळ वाटप केले आहे. या रेशनकार्ड वरील 6 कोटी 35 लाख 56 हजार 63 लोकसंख्येला 31 लाख 77 हजार 803 क्विंटल तांदळाचे वाटप झाले आहे.

Post a comment

 
Top