0

BY - संतोष पिलके, युवा महाराष्ट्र लाइव- चिपळूण |
नगरसेवक बिलाल पालकर , नगरसेविका शिवानी पवार यांच्या प्रयत्नाने आज सोमवार दिनांक 20 जुलै रोजी चिपळूण नगर परिषद आणि आरोग्य विभाग जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती चिपळूण यांच्या संयुक्त विद्यमाने दादर मोहल्ला,जुना भैरी, वाणी आळी, बाजार पेठ, पवार आळी, जुमा मसिद मोहल्ला या वॉर्ड क्रमांक ५ येथे आरोग्य तपासणी सुरू झाली आहे.हे पथक घराघरात जाऊन ऑक्सो मीटर व इन्फ्रा टेंपरेचरच्या माध्यमातून नागरिकांची तपासणी करीत आहेत.यावेळी नगरसेवक बिलाल पालकर ,नगरसेविका शिवानी पवार आणि वॉर्ड क्रमाक ५ मधील नागरिक उपस्थित होते.याबद्दल येथील नागरिकांनी या दोन्ही नगरसेवकांचे आभार व्यक्त केले आहेत.

Post a comment

 
Top