web-ads-yml-728x90

Breaking News

खासदार निधी पूर्ववत देण्याबाबत खासदार विनायक राऊत यांचे नरेंद्र मोदी यांना निवेदन


BY - संतोष पिलके, युवा महाराष्ट्र लाइव- चिपळूण |
कोरोना संकटाच्या काळात२०२०-२१व २०२१-२२ या वर्षातील खासदार निधी न देण्याचे केंद्र सरकारने ठरवले आहे. परंतु यामुळे स्थानिक विकासावर मोठा परिणाम होणार आहे, त्यामुळे हा निर्णय रद्द करून खासदारांना खासदारांचा स्थानिक विकास निधी द्यावा, असे पत्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदार संघाचे खासदार विनायक राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिले आहे. खासदार निधीतून मतदार संघातील शिक्षण, पाणी, आरोग्य, स्वच्छता अशा सुविधांबरोबरच भूकंप, सुनामी अशा आपत्तीच्या संकटात सामान्य माणसाला मदत केली जाते, मात्र हा निधी न देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने त्याचा स्थानिक विकासावर मोठा परिणाम होणार आहे, त्यामुळे हा निर्णय रद्द करावा व पूर्ववत खासदार निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती या पत्रातून खा. विनायक राऊत यांनी केली आहे. या बाबत खासदार विनायक राऊत यांच्या प्रसिद्धी विभागाकडून प्रसार मध्यमाना माहिती देण्यात आली.

No comments