web-ads-yml-728x90

Breaking News

मन्नुभार्इ - कोणत्या रिंगमध्ये = बोगस दारूचे लेखापरिषण कधी ?


BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुरबाड |
मुरबाड शहरातील भारत वॉइन शॉपमध्ये बनावटी दारू आणि स्थानिक रहदारीचा रस्ता आणि त्यात मंदिर जवळ व महिलांची याच रस्त्यातुन ये जा करणे असून समोरच शाळा,महाविद्दयालय आहे याच परिसरात नागरिकांची वस्ती असून याच भागालगत वॉर्इनशॉप बाजुला दारू पिणार्या दारूडींचा हौदास असतो अशा गंभीर बाबीकडे लक्ष वेधले असता येथून महिलांच्या सुरक्षितेचा प्रश्न उपस्थित होत आहे.या दृष्टिकोणातून भारत वॉर्इन शॉपमध्ये दारू खरेदीसाठी धुमाकुळ असतो.याच वॉर्इनशॉपलगत काही ऑफीसच्या गच्चीत दारूडे बाटल्या फोडतात.याच वॉर्इन शॉपच्या बनावटी दारूमुळे काही लोकांना आपला जीव गमवावा लागल्याची चर्चा आहे त्यामुळे या भारत वॉर्इन शॉपला बंद करण्याची मागणी मुख्यमंत्री यांच्यासह जिल्हाधिकारी,मुरबाड तहसिलदार यांचेकडे करण्यात आली होती परंतू कोणतीही चौकशी अथवा कारवार्इ करण्यात अधिकारी वर्गाला यश आले नाही.संबंधित विभागाचे अधिकारी यांच्या संगणमताने आणि राजकीय समर्थकाच्या पाठिराख्याने भारत वॉर्इनशॉपने गुन्डांचा सहारा घेत तक्रारदारांना धमक्याचा चाप दाखविला जात आहे.
     कोरोना कालावधीत मन्नुभार्इचा वॉर्इनशॉप बंद करा अशी मागणी महिलावर्गांनी केली होती परंतु कोणतीही कारवार्इ न झाल्याने मन्नुभार्इ दारू विक्रीचा बादशाहा बनला आहे.या भारत वॉर्इन शॉपला तहसिलदारांनी परवानगी दिली नाही.याच भारत वॉर्इन शॉपमध्ये बनावट दारूची विक्री केली जाते अशी ओरड होती.अनेकांचा बळी याच मन्नुभार्इच्या दारूमुळे झाला याकडे सरकारचे दुर्लक्ष झाले त्याला कारणीभुत सरकार आणि हप्ताबहादूर संबंधित अधिकारी सरकारी अधिकारी होते.आता मुरबाड शहरात कोरोना कालावधीत र्इविंग आणि बिविंग अशी दुकाने सुरू झाली मात्र,मन्नुभार्इचा वॉर्इन शॉप मुरबाड नगरपंचायतीच्या कार्यालयाखाली आहे त्याचे दुकान रोज सुरू असतंच,त्याला कोणते विंग आहे.एवढी मेहरबानी लाचारी कोण करतोय त्याचं लेखापरिक्षण होऊन वॉर्इन शॉप बंद झालं पाहिजे अशी मागणी आज मुख्यमंत्री,जिल्हाधिकारी यांचेकडे पत्रव्यवहार करून करण्यात आली आहे.
गटारी अमवस्याला प्रचंड दारूची विक्री झली त्यामध्ये किती बनावट दारू विक्री झाली.आजही राजरोस दारू विक्री होत आहे.लॉकडाऊन कालावधीत चोरून दारू विक्री झाली.मन्नुभार्इकडे दारू आली कोठून ? कोणत्या बॅन्डची दारू विकतो ? लायसन्स कोणतं आहे ? जी.एस.टी किती भरतो ? रोज विक्री किती करतो ? सरकारचा महसूल किती बुडवतो ? लाचार हप्तेखोर अधिकार्यावर किती पैसे उडवतो याचं लेखापरिक्षण झालं पाहिजे.जसं शासन डॉक्टर,हॉस्पीटलचं लेखापरिक्षण चौकशी करतो तसे मन्नुभार्इच्या भारत वॉर्इन शॉपची तपासणी करतो तसे मनुभार्इच्या भारत वॉर्इन शॉपची तपासणी झाली पाहिजे अशी मागणी विकासमंचच्या अध्यक्षा सौ.ज्योतीतार्इ शेलार यांनी शासनाकडे केली आहे.  
----------------------------------------------------------------------------------
जिथं महिलांची सुरक्षा वार्यावर येत असेल तिथं आम्ही सहन करणार नाहीत.अनधिकृत जागेत मन्नुभार्इ बसलायं त्याला पहिलं मुरबाड तालुक्याबाहेर काढा,याच दारूमुळे विविध प्रकार घडले असून बनावटी दारूमुळे एखाद्दयाचा जीवही गेला असेल अद्दयापही पुढिल जीव वाचवायाचं असेल तर शासनाने या भारत वॉर्इन शॉपला बंद केलं पाहिजे अशी आमची मागणी आहे.
                                      - सौ.सरिता नार्इक, अध्यक्ष : ठाणे जिल्हा हृयुमनरार्इट
----------------------------------------------------------------------------------

No comments