0

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
विवाहविषयक (मॅट्रिमोनियल) वेबसाईटवर सायबर भामट्यांकडून  ऑनलाईन आर्थिक फसवणूक होऊ शकते. अशा साईट वापरताना सावधगिरी बाळगण्याचे आवाहन ‘महाराष्ट्र सायबर’तर्फे करण्यात येत आहे.
सध्याच्या काळात बऱ्याच उपवर मुलामुलींचे पालक आपल्या पाल्याच्या लग्नासाठी योग्य जोडीदार निवडण्यासाठी अनेक ऑनलाईन मॅट्रिमोनियल वेबसाईटवर नोंदणी करतात. बऱ्याच विवाह जमविणाऱ्या संस्थांनी पण आता स्वतःच्या वेबसाईट सुरु केल्या आहेत ज्यावर ते सर्व उपवर मुले व मुलींच्या पालकांना नोंदणी करण्यास सांगत आहेत . बऱ्याचदा पालक किंवा मुलगा /मुलगी स्वतः या वेबसाईटवर  प्रोफाईल बनवून त्यात आपली माहिती ,परिवाराची माहिती व फोटो अपलोड करत आहेत . अशा वेबसाईट या सायबर भामट्यांकरिता या लोकांची ऑनलाईन आर्थिक फसवणूक करण्यासाठी किंवा हा सर्व डेटा डार्कनेटवर किंवा इंटरनेटच्या काळ्या बाजारात विकण्यास एकदम सोपे असे लक्ष्य आहे.
अशा वेबसाईटद्वारे ऑनलाईन फसविले जाणाऱ्यांची संख्यादेखील बऱ्याच प्रमाणात आहे . दुर्दैवाने यामध्ये फसविले गेलेल्यांमध्ये मुलींची संख्या ही मुलांच्या तुलनेने  जास्त आहे . या फसवणुकीचे अनेक प्रकार आहेत.

Post a comment

 
Top