0

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

हक्काचे स्वतःचे घर असावे असे सर्वसामान्य जनतेचे स्वप्न असते आणि ते प्रत्यक्षात उतरवायला सुरुवात झाली आहे. यापुढील काळातसुद्धा आमच्या शासनाची ही वचनबद्धता असेल असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. आज त्यांच्या हस्ते पोलिसांसाठी असलेल्या ४४६६ घरांच्या योजनेचा शुभारंभ, सिडकोच्या गृहनिर्माण योजनेतील ३६७० यशस्वी अर्जदारांना घरांचे ऑनलाईन वाटप, तसेच निवारा केंद्राचे आणि खारघर हेवन हिल्स प्रकल्पाचा शुभारंभ करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते.उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे, गृहमंत्री अनिल देशमुख, कामगारमंत्री नवाब मलिक, गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, परिवहन मंत्री अनिल परब, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, पोलीस महासंचालक सुबोध कुमार जायस्वाल, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र आदी यावेळी उपस्थित होते.यावेळी सिडकोतर्फे मुख्यमंत्री सहाय्यता निधीमध्ये रू. १ कोटीची मदत करण्यात आली . सध्या सुरू असलेल्या कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी सिडकोतर्फे या माध्यमातून योगदान करण्यात आले आहे.आज माझ्या वाढदिवसाचे निमित्त ठरवून सर्वसामान्यांचे घरांचे स्वप्न वास्तवात आणणारा कार्यक्रम करीत आहेत ही माझ्यासाठी अनोखी भेट आहे असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.   पूर्वी  इंग्रजांनी थंड हवेची ठिकाणे विकसित केली, त्याठिकाणी राहण्याच्या सोयी केल्या. शहरालगत इतक्या जवळ आणि विमानतळापासून हाकेच्या अंतरावरील खारघर हेवन हिल्स हे देखील एकप्रकारे वैशिष्ट्यपूर्ण हिल स्टेशन राहील असेही मुख्यमंत्री म्हणाले.


Post a comment

 
Top