web-ads-yml-728x90

Breaking News

देवा ग्रुप फाऊंडेशन खर्डी कसारा येथे तानाजीभाऊ मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त मास्क,सॅनिटायझरचे पोलिस ठाण्यात वाटप


BY - युवा महाराष्ट्र लाइव- शहापूर |
देवा ग्रुप फाऊंडेशनचे सचिव तानाजीभाऊ मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त ठाणे जिल्हयातील शहापूर तसेच खर्डी,कसारा येथे  तालुकाध्यक्ष भास्कर विशे तसेच देवा ग्रुप फाऊंडेशन पदाधिकारी यांनी पोलिस ठाण्यात  मास्क व सॅनिटायजरचे वाटप केले.
आगळा वेगळा उपक्रम नेहमी देवा ग्रुप फाऊंडेशन करत असुन यंदाच्या कोरोना प्रादुर्भावातही एक पाऊल पुढे सरत भास्कर विशे यांनी हा समाजसेवि उपक्रम हाती घेऊन पुन्हा एकदा सामाजिक कार्याचा वारसा जोपासला आहे.
खर्डी,कसारा विभागात अन्नदान,शिबीरे,मदतीचा हा भास्कर विशे यांचा गोरगरिबांना देवा ग्रुप फाऊंडेशनच्या माध्यमातून मिळत असून त्यांच्या कार्याचा लेखाजोखा संपुर्ण ठाणे जिल्हयात गाजला आहे.यापुढे ही त्यांचा अनोखा उपक्रम गरिबांच्या सेवेसी असल्याचे त्यांनी आमच्याशी बोलतांना सांगितले आहे.

No comments