BY - युवा महाराष्ट्र लाइव - चंद्रपूर |
कोरोना संक्रमण
काळामध्ये मोठ्या प्रमाणात नागरिक जिल्ह्यात परतत आहेत. त्यामुळे जिल्ह्यामध्ये
पॉझिटिव्ह संक्रमितांची संख्या वाढत आहे. तालुक्यात येणाऱ्या प्रत्येक नव्या
नागरिकाची माहिती वेळेत मिळावी, त्या संदर्भातील निर्णय वेळेत व्हावा, याकडे लक्ष
वेधण्याचे आवाहन पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी केले.सिंदेवाही येथील तहसील
कार्यालयामध्ये त्यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला सिंदेवाहीचे तहसीलदार गणेश जगदाळे, गटविकास अधिकारी
इंदूरकर, नगरपंचायत सिंदेवाहीच्या मुख्याधिकारी डॉ. सुप्रिया राठोड, सिंदेवाही
तालुका आरोग्य अधिकारी ललित पटले, जिल्हा परिषदेचे सदस्य रमाकांत लोधे,
उपनगराध्यक्ष स्वप्निल काळे, पंचायत समिती सदस्य राहुल पोरेड्डीवार आदींची
उपस्थिती होती.
Post a comment