web-ads-yml-728x90

Breaking News

माळशेजघाट धोक्याचा घाट कायम प्रवास;महिलेची आब्रु लूटली;जागतिक पर्यटणस्थळ माळशेजघाटात पर्यटकांवर परिणाम नको


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड,ठाणे |
इतिहास काळीन सहयाद्रीपर्वत माळशेजघाट आज जागतिक पर्यटनाच्या उंबरटयावर जात आहे. जगात सर्वात मोठा काचेचा सुरक्षित पुल उभा करण्यासाठी सरकार 500 कोटी रूपये देणार आहे.त्या कामाचा सर्व्हे झाला आहे.स्वातंञ्यापुर्वी छत्रपती शिवाजी महाराज शिवनेरी वरून याच माळशेज न्हाने घाटातून प्रवास केल्याचा इतिहास आहे.रामाची सितामार्इ सुध्दा माळशेज घाटातुन अर्जापर्वताकडे गेली असल्याचा इतिहास आहे.अशा माळशेज पावन घाट भिमाशंकर,अजापर्वत,गोरखगड,सिध्दगड,न्हानेघाट,माळमठ याचा इतिहासीक ठेवा आहे.औषधीवनोस्पती पशुप्राणी निसर्गामय वातावरणासह संपुर्ण महाराष्ट्रात माळशेजघाट धबधबेने पर्यटकाचं आकर्षित केंन्द्रबिंदू ठरले आहे.मुंबर्इपासून 80 किलो मिटर माळशेज घाटाचा प्रवेश सुरू होतो घाटाचा प्रवास 40 किलो मिटरचा आहे.मुंबर्इ कल्याण मुरबाड माळशेजघाट औतुर आळेफाटा नगर शिवनेरी पुणे जेजुरी असा प्रवास मार्ग आहे.स्वातंञ्यापुर्वी येथील पाऊलवाटा आजही पर्यटकाना खुणावत आहेत.माळशेजघाटातील रस्ते पुर्वी एकरी खडडेमय होते मात्र आज माळशेजघाटाचे रस्ते संरक्षणभिंती निर्माण होत आहेत.दुहेरी वाहाने जात आहेत.वेडीवाकडी वळणे तेथील पिकनिक पॉईंट निसर्गरम्य वातावरण पर्यटकाना बाराहिमहिने आकर्षित करतात येथे पावसाळयात धबधब्याची मज्जा लुटण्यासाठी लाखो पर्यटक येतात त्यामुळे येथील आदिवासी बांधवाना रानमेवा रोजगाराचे साधन निर्माण झाले.घनदाट जंगल अपुर्‍या संरक्षणात यापुर्वी माळशेजघाट आपघात ग्रस्त तसेच दरोडेखोर लुटारू अशा प्रकाराने वाहानचालक प्रवाशी भयभित झाले होते मात्र मुरबाडच्या लोकप्रतिनिधी आमदारानी त्याचं प्रमाणे कै.शांतारामभाऊ घोलप माजी महसुलमंत्री यांनी माळशेज घाटातील रस्ते सुसज्ज केले.स्थानिक आमदाराचं त्यामध्ये मोठे विकासीत योगदान आहे.गेल्या 10 वर्षात माळशेजघाटातील लुटमार आपघात कमी झालं पर्यटक वाहानचालक भिती मुक्त झाले मोरोशी येथे पोलिस चौकी झाली टोकावडे येथे नविन पोलिस ठाणे झाले.माळशेजघाटात रात्रीची पोलिस पेट्रोलिंग सुरू झाली.नॅशनल हायवेचे आरटीओ कार्यालय झाले आरटीओ माळशेज घाटात वाहाने तपासू लागल्याने अनेक अवैध प्रकाराना आळा बसला आपघातग्रस्त घाटासाठी आपत्कालीन यंत्रणा सज्ज झाली माळशेजघाटातुुन रात्री येणारे पर्यटक प्रवाशी भितीमुक्त झाले.मुरबाड कल्याण माळशेज औतुर पर्यंत रस्त्यालगत धाबे हॉटेल सजले मात्र 18 जुलैच्या रात्रीने सार्‍यावर पाणी फेडले

जुलै 19 शनिवार गटारी आमवश्याची पहिली रात्र बेवडयांचा थैमान आणि कोरोनाचा संकट

कोरोनाने सायांना घरात कोंबले पोलिसानी वाहानाना मागे फिरवले मात्र स्थानिक बेवडयांनी जागतिक पर्यटनाच्या दिशेने जाणाया पर्यटनाला लज्जास्पद स्पर्श केला आणि महिला सुरक्षा यंत्रणा कवच तेथेच विझला….!
               मुंबर्इ बोरिवली कडील एक तरूण एक तरूणी माळशेजघाटाकडे गेली होती रात्री परत येताना माळशेजघाटाच्या पायथ्याशी मोरोशी जवळ न्याहाडीच्या वळणावर चार बेवडयांची नियत फिरली त्यांनी मुंबर्इकडे येणार्‍या तरूण तरूणीची मोटारसायकल आडवून तरूणाला मारून तरूणीवर विनयभंग अत्याचार केला तिचे कपडे फाडले तिच्या वेदना तिलाच माहित मात्र तिची सुटाका बेवडयांनी केली नाही.सोबतीचा तरूण कसाबिसा चार बेवडयांच्या हातून सुटून मोरोशी गांवात गेला सारी हाकीगत सांगितली तेथील लोक घटनास्थळी आले त्यावेळी तरूणीच्या अंगावरील कपडे बेवडयानी फाडले होते.घुणाशू प्रकार टोकावडे पोलिस ठाण्यात पोहचला मात्र टोकावडे पोलिसानी त्यांची गंभीर दखल घेतली नाही.सोशल मिडीयावर घटनेचा निर्षेध सुरू झाला टोकावडे पोलिस अधिकारी खरमटे यांना पत्रकारानी माहिती विचारली त्यांनी माहिती देण्यास नकार दिला वरून कशाला बातमी देता तुमच्यावर केस होर्इल असंही सांगितल मात्र मुरबाड एकीचं बळ आहे.निर्भिड पत्रकारानी बातम्या दिल्या सोशल मिडीयावर सामाजिक चळवळीचे कार्यकर्ते नागरिकांनी घटनेचा निर्षेध करत अशा किती घटना टोकावडे पोलिसानी दडपल्या महिलाचं संरक्षण हेच आहे काय? दारू अवैध धंदयाना पाठबळ देणारं पोलिसाचं महाविकास अघाडी सरकार आरोपीना पाठिशी घालणार स्थानिक काही पुढारी तपासी पोलिस अधिकारी यांचा जाहिर निर्षेध करून घटनेची गांर्भीय जाणून आरोपीतावर कारवार्इ करावी.माळशेज घाटाचे पावित्र राखावं अन्यथा जागतिक पर्यटनस्थळ माळशेजवर पर्यटक येणार नाहीत अशी भिती व्यक्त केली जात आहे.एरवी पोलिस गाडया आडवतात आरटीओ गाडया आडवतात पैसे घेवुन सोडतात मग कोरोना काळात कुठे गेली होती पोलिसांची सुरक्षा याला जबाबदार असणार्‍या पोलिसावर कारवार्इ झाली पाहिजे आरोपींना पाठिशी घालण्यासाठी पोलिसानी त्या तरूणीची मेडीकल तात्काळ केली नाही.आरोपी तात्काळ पकडले नाही अशा पोलिसाना महाविकास अघाडी सरकारने तात्काळ निलंबित केले पाहिजे.मुरबाड तालुक्यात महिला लहानमुली अत्याचाराचे मुली गायब होण्याचे प्रकार वाढले पोलिसानी त्याचा तपास लावला काय याचा जाब गृहमंत्रीनी विचारला पाहिजे.माळशेजघाटातुन जाणार्‍या येणार्‍या पर्यटकांची सुरक्षा सरकारने सांभाळली पाहिजे अशा भावना व्यक्त होत आहेत.

No comments