web-ads-yml-728x90

Breaking News

“ लाखो दिलोकी शान ’’ ठरलेल्या देवा ग्रुप फाऊंडेशनचे महाराष्ट्र सचिव तानाजीभाऊ मोरे यांच्या वाढदिवसनिमित्त संपुर्ण महाराष्ट्रात सामाजिक कार्याचा अनोखा उपक्रम ; अनेकांनी दिल्या उदंड आयुष्याच्या शुभेच्छा


BY - कुणाल शेलार,युवा महाराष्ट्र लाइव- ठाणे |
संपुर्ण महाराष्ट्रात एकमेव नावलौकिक ठरलेले देवा ग्रुप फाऊंडेशन असून त्या फाऊंडेशच्या माध्यमातून आजपर्यंत हजारो,लाखो गोरगरिबांना मदतीचा हात देऊन त्यांच्या समस्यांचे निराकरण करत अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळून देण्याचा मानस गाठला आहे.
जिथं मदतीच्या हाकेची गरज पडते तिथे देवा ग्रुप फाऊंडेशन मोठया धाडसाने व एकतेने,जाती पातीला मागे टाकून सढळ हाताने पुढाकार घेते अशा.बेहमी आपण एैकले की,आदराची शिकवण आणि संस्काराचे मोती हे आपल्या गुरूंकडून शिष्यांना प्राप्त होते 
अशाच संस्काराचे मोती आणि माणुसकीची झरी जपणारे,तरूण गर्वाला चांगल्या आणि सत्याच्या वाटेवर मार्गदर्शन करून त्यांच्या जीवनात चांगल्या विचारांची देवाण-घेवाण आणि हक्काचे व्यासपिठ निर्माण करून देणारे महाराष्ट्राचे लाडके तसेच देवा ग्रुप फाऊंडेशन महाराष्ट्र राज्याचे सचिव मा.तानाजीभाऊ मोरे आज लाखो युवकांच्या गळयातील तावित बनले आहे.
अडचण असली की भाऊ उभे,सामाजिक कार्याचा लेखाजोखा मार्गदर्शक म्हणून भाऊंचा सल्ला,एखाद्दयाला चांगली शिकवण व हक्काची जनजागृती म्हणजे भाऊंची मुलाखत,सामाजिक कार्याचा वारसा म्हणजे भाऊंची परंपरा,जात पात विरहीत सर्वांना सोबत घेऊन चालणारे एकतेचे प्रतिक म्हणजे भाऊ,स्वतःचे दुखः बाजुला सरून दुसर्यांच्या सुखःत सामील होणारे जीवाभावाचे भाऊ आणि या सर्वांची साथ तसेच वृध्द,अपंग,निराधार,अनाथ,जगतगुरूंचा आशिर्वाद घेऊन विचार पुर्वक पाऊल टाकून 100 टक्के यशस्वीशिखर गाठणारे मा.तानाजीभाऊ मोरे यांचा आज वाढदिवस.
कोरोनाचे प्रादुर्भाव आणि लॉकडाऊनची मर्यादा जरी असली तरी युवकांचे मनोबल आणि त्यांना देवा ग्रुप फाऊंडेशनकडून मिळालेले प्रेम,संस्कारामुळे सर्व महाराष्ट्राच्या पदाधिकार्यांनी भाऊंच्या वाढदिवसामुळे त्या त्या जिल्हयात,तालुक्यात,गावागावात,शाखे शाखेत देवा ग्रुप फाऊंडेशनचे महाराष्ट्र राज्याचे सचिव तसेच महाराष्ट्राचे लाडके तानाजीभाऊ मोरे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्य राबविण्यात आले.
कोरोना व लॉकडाऊनमुळे भाऊंचा वाढदिवस दरवर्षीप्रमाणे साजरा करण्यात जरी नसेल आला तरी त्यांना उदंड आयुष्याच्या शुभेच्छा युवक,विविध राजकीय नेते,विविध पक्षांचे कार्यकर्ते,पत्रकार,वकील,समाजसेवक,गायक,चित्रपट सृष्टीचे अभिनेता / अभिनेत्री यांनी फोनद्वारे,मॅसेच,सोशल मिडीयाद्वारे लाखो चाहत्याचे दिल्या.
तरूणवर्गांनी तर सामाजिक कार्याचा उच्चांकच गाठला.ॅम्ब्युलन्स सेवा लोकार्पण,सॅनिटायझर फवारणी व मास्कचे पोलिस ठाण्यात वाटप,किल्ले संवर्धन व वृक्षरोपण,कोरोना रूग्णांना फळ व खाऊ वाटप,गरजू विद्दयार्थ्यांना शालेय साहित्य वाटप,रक्तदान शिबीरे,शाळेत सॅनिटायझर फवारणी,वृक्ष लागवड,कोरोना जनजागृती,अनाथाश्रमांना जीवनावश्यक वस्तू वाटप करण्यात आले.
जनसामान्यांची सावली तसेच गोरगरिबांचे वाली,आधास्तंभ म्हणून दिलदार असे व्यक्तीमत्व तानाजीभाऊ मोरे यांच्या पुढिल सामाजिक कार्यास शुभेच्छांचा वर्षाव करून त्यांच्या आजच्या वाढदिवसाच्या सोन्यादिवशी मनःपूर्वक शुभेच्छा,आशिर्वाद दिले.
तानाजीभाऊ मोरे यांनी आपल्या जीवनात किर्ती महान भुमिका साकारल्याने लाखो दिलोकी शान आणि अभिमानास्पद व प्रत्येक कार्यात सिंहाचा वाटा असल्याने युवा महाराष्ट्र लार्इव्ह वृत्तवाहिनीने अशा कर्तृत्वाला पाहिले आहे. 

( “ लाखो दिलोकी शान ’’ देवा ग्रुप फाऊंडेशनचे महाराष्ट्र सचिव तानाजीभाऊ मोरे )


No comments