0

BY -  युवा महाराष्ट्र लाइव - अमरावती |
जल जीवन मिशनद्वारे ग्रामीण भागातील प्रत्येक  घराला  नळ जोडणीव्दारे पाणी पुरवठा करण्याचे शासनाचे नियोजन आहे. त्याचप्रमाणे, ग्रामीण भागातील नागरिकांना शुद्ध पेयजल मिळावे यासाठी मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेचा कालावधी दोन वर्षांनी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामीण पाणीपुरवठ्याची प्रगतीपथावरील व अपूर्ण कामे तत्काळ पूर्णत्वास न्यावी व जिल्ह्याचा आढावा घेऊन आवश्यक कामांचे प्रस्ताव द्यावेत, असे निर्देश राज्याच्या महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी दिले.मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम योजनेतील मंजुरी देण्यात आलेल्या प्रगतीपथावरील व अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्याकरिता आता या योजनेस दोन वर्षे (सन २०२१-२२ पर्यंत) मुदतवाढ देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. ग्रामीण जनतेला शुध्द व पुरेसे पिण्याचे पाणी उपलब्ध करुन देण्याच्या उद्देशाने पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाकडून मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम राबवली जाते. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रमांतर्गत राज्यात सुमारे ६०० कोटी इतक्या किंमतीच्या ७४३ नवीन पाणीपुरवठा योजना राबविण्यास मंजूरी देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, राज्यात ११८ कोटी६३ लाख इतक्या किंमतीच्या ३२ बंद असलेल्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजना पुनरुज्जिवित करण्यास मंजूरी देण्यात आली आहे. अशा सर्व पाणीपुरवठा योजनांची कामे प्रगतीपथावर आहेत. मुख्यमंत्री ग्रामीण पेयजल कार्यक्रम या योजनेचा कालावधी ३१ मार्च, २०२० रोजी संपुष्टात आला होता. या कार्यक्रमांतर्गत मंजूरी देण्यात आलेल्या प्रगतीपथावरील व अपूर्ण पाणीपुरवठा योजनांची कामे पूर्ण करण्यासाठी या योजनेस दोन वर्षे मुदतवाढ देण्यात आली आहे. 

Post a comment

 
Top