0

BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
राज्यात आज ३३४० रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.१५ टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या १ लाख ४० हजार ३२५ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ७८२७ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ३ हजार ५१६ रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.आजपर्यंत पाठविण्यात आलेल्या१३ लाख  १७ हजार ८९५ नमुन्यांपैकी २ लाख ५४ हजार४२७ नमुने पॉझिटिव्ह (१९.३ टक्के) आलेआहेत. राज्यात ६ लाख ८६ हजार १५० लोक होम क्वारंटाईनमध्ये आहेत. सध्या ४७ हजार ८०१ लोक संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेतराज्यात आज १७३ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद झाली असून सध्या राज्यातील मृत्यूदर ४.४ टक्के एवढा आहे.

Post a comment

 
Top