web-ads-yml-728x90

Breaking News

जनता कर्फ्यू नागपूर ; नागरिकांचा योग्य प्रतिसाद...


BY - युवा महाराष्ट्र लाइव- नागपूर |
शहरात आजपासून (शनिवार) दोन दिवसीय जनता कर्फ्युला सुरुवात झाली आहे. या जनता कर्फ्यूत मोठ्या प्रमाणात बाहेर पडणाऱ्या नागरिकांनी स्वतःहून घरीच राहणे पसंत केले आहे.यामुळे शहरवासियांनी जनता कर्फ्युला योग्य प्रतिसाद दिल्याचे बघायला मिळत आहे. शहरात 60 ठिकाणी पोलिसांनी मोठी नाकाबंदी केली आहे. यासाठी 2 हजार 300 कर्मचारी, 350 अधिकारी यांच्यासह 350 होमगार्ड असे 3 हजार अधिकारी कर्मचाऱ्यांना जनता कर्फ्युच्या बंदोबस्तात लावण्यात आले आहे. सातत्याने पोलिसांचे वाहन शहरात फिरून जनता कर्फ्युचे पालन करा, असे आवाहन करताना दिसून येत आहे.

No comments