web-ads-yml-728x90

Breaking News

लॉकडाऊन हे अंतिम उत्तर नाही; सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची शासन-प्रशासनाची भूमिका


BY - युवा महाराष्ट्र लाइव- नाशिक |
राज्यासह जिल्ह्यातील नागरिकांनी सद्भावनेतून पुढाकार घेऊन लॉकडाऊन केले, मात्र त्यातून काही हाती लागत नसल्याचे वेळोवेळी दिसून आले आहे. लॉकडाऊनच्या विरोधात आपली भूमिका नसून सर्वांना सोबत घेऊन काम करण्यावर भर आहे; पुढील आठवड्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तज्ञांसमवेत नाशिक दौऱ्यावर येणार आहेत त्यावेळी लॉकडाऊन तसेच इतरही अनुषंगिक निर्णय मुख्यमंत्री यांच्यासमवेत चर्चा करून घेतले जातील, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. ते आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांसमवेत झालेल्या कोरोना संदर्भातील आढावा बैठकीत बोलत होते.
या बैठकीस विभागीय आयुक्त राजाराम  माने, महानिरीक्षक छेरिंग दोरजे , जिल्हाधिकारी सूरज मांढरे, मनपा आयुक्त राधाकृष्ण गमे, पोलीस पोलीस अधीक्षक (ग्रामीण) डॉ.आरती सिंह, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपील आहेर, पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील आदी उपस्थित होते.

No comments