web-ads-yml-728x90

Breaking News

मराठा आरक्षण : सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात


BY - युवा महाराष्ट्र लाइव - नवी दिल्ली |
मराठा आरक्षणावर आज (मंगळवारी) सर्वोच्च न्यायालयात सुनावणीला सुरुवात झाली आहे. आजच्या या सुनावणीकडे सर्वांचेच लागले आहे.मराठा आरक्षणाच्या न्यायालयीन प्रकरणाच्या पाठपुराव्यासाठी राज्य सरकारने स्थापन केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची वरिष्ठ विधिज्ञांसमवेत 4 जुलैला बैठक झाली होती. व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झालेल्या या बैठकीत आज (मंगळवारी) सर्वोच्च न्यायालयात नियोजित करण्यात आलेल्या सुनावणीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला होता.न्या. नागेश्वर राव यांच्या खंडपीठात पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेश प्रक्रियेसंदर्भातील याचिका आज सुनावणीसाठी येणार आहे आणि मराठा आरक्षणाच्या मूळ याचिकेवरही विचार होण्याची शक्यता आहे.
मराठा आरक्षणासंदर्भात न्यायालयामध्ये 7 जुलैला होणाऱ्या सुनावणीदरम्यान सरकारकडून भक्कमपणे बाजू मांडली जाईल, असे मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी म्हटले आहे. सरकारच्या वतीने पूर्ण तयारी झाली आहे. न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू भक्कमपणे मांडण्यासाठी सरकारकडून 1 हजार 500 पानांचे शपथपत्र तयार करण्यात आले आहे. मागील सत्ताकाळात आमच्या सरकारने राज्यातील मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी हे आरक्षण लागू केले होते. मधल्या काळात भाजपा सरकारने काही प्रयत्न केले. मात्र, न्यायालयात हे आरक्षण टिकले पाहिजे, यासाठी आम्ही पूर्ण तयारी केली असल्याची माहिती चव्हाण यांनी दिली. मार्च महिन्यात न्यायालयाने मराठा आरक्षणासंदर्भात याचिका फेटाळली होती. त्यानंतर मराठा आरक्षणाच्या उपसमितीने नव्याने अभ्यास करून न्यायालयात बाजू मांडायची तयारी केली.

No comments