web-ads-yml-728x90

Breaking News

यशस्वी सुवर्णकन्यांचा नवकोकण संस्थेला अभिमान -बाबू तांबे


BY - संतोष पिलके, युवा महाराष्ट्र लाइव- चिपळूण |
नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे आणि डी बी जे महाविद्यालयाचे नांव कोकणातच नव्हे तर राज्यांत उंचावण्याऱ्या तिन्ही सुवर्णकन्यांचा आम्हांला सार्थ अभिमान आहे असे कौतुकोदगार व्यक्त केले नवकोकण एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन मंगेश उर्फ बाबू तांबे ह्यांनी..निमित्त होते नुकत्याच जाहीर झालेल्या बारावीच्या निकालात उल्लेखनीय यश प्राप्त करणाऱ्या सुवर्णकन्यांचा सत्काराचे.बारावीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून येथील नवकोकण एज्युकेशन सोसायटीच्या डी बी जे महाविद्यालयाचा ९६टक्के निकाल लागल्याने संस्थेत उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
       बारावीच्या परीक्षेत ईशानी दीपक जोशी (विज्ञान)८९.६९,सई दिनेश शिंदे(वाणिज्य)९४.१५ व श्रुती शेखर तटकरे(कला)८८.४६ ह्या तीन प्रथम आलेल्या सुवर्णकन्यांचा सत्कार संस्थेच्या वतीने अत्यंत साधेपणाने करण्यात आला.सध्य स्थितीत कोरोनाचा  संसर्ग पसरत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचे भान ठेवत मोजक्या सदस्यांच्या उपस्थितीत सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले.तिन्ही सुवर्णकन्यांचा सत्कार संस्थेचे चेअरमन मंगेश तांबे,व्हाईस चेअरमन जीवन रेळेकर व सुचयअण्णा रेडीज ह्यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी तिन्ही सुवर्णकन्यांचे पालक यांच्यासह संस्थेचे खजिनदार संजीव रेडीज , प्राचार्य बाळसर,अनघा गोखले यावेळी संस्थेचे सेक्रेटरी माधव चितळे,नित्यानंद भागवत कनिष्ठ विद्यालयाचे व्हाईस प्रिन्सिपल बिराजदारमॅडम, पर्यवेक्षक तळपसर, आदी संचालक सदस्य उपस्थित होते

No comments