‘महाजॉब ॲप’चे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण
BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
उद्योग विभागाच्या वतीने विकसित करण्यात आलेल्या ‘महाजॉब्ज
ॲप्लिकेशन’चे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आले. या निमित्ताने
उद्योग क्षेत्रात उपलब्ध असलेल्या नोकऱ्यांचा भूमिपुत्रांनी लाभ घ्यावा, असे आवाहन
मुख्यमंत्र्यांनी केले. यावेळी उद्योगमंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.उद्योग, कामगार
तसेच कौशल्य विकास विभागाच्या वतीने स्थानिक तरुणांना रोजगार देण्यासाठी 6 जुलै रोजी महाजॉब्ज वेबपोर्टलेचे उद्घाटन श्री. ठाकरे यांच्या
हस्ते करण्यात आले होते. अवघ्या दोन दिवसांत लाखभर तरुणांनी नोकरीसाठी नोंदणी
केली होती. तरीही ही प्रक्रिया अधिक सुकर व्हावी व तरुणांना हे पोर्टल सहजपणे वापरता
यावे, यासाठी मोबाइल ॲप्लिकेशन विकसित करण्याची सूचना श्री. ठाकरे यांनी केली होती.
त्यानुसार महाजॉब्ज हे ॲप विकसित करण्यात आले आहे. मुख्यमंत्री ठाकरे यांच्या वाढदिवसाचे
औचित्य साधून महाजॉब्ज ॲपचे अनावरण करण्यात आले.मोबाइल ॲपमुळे तरुणांना विनासयास नोकरी
शोधणे शक्य होईल, आपल्या पसंतीनुसार नोकरीचे ठिकाण देखील निवडता येईल तसेच तरुणांना
रोजगारासंबंधी सर्व माहिती आपल्या मोबाइलमधून सहज मिळणार आहे. नोकरी मागणारे आणि देणारे
यांच्यातील संवाद यामुळे वाढण्यास मदत होईल, असे ठाकरे म्हणाले.
No comments