web-ads-yml-728x90

Breaking News

कुपोषणमुक्तीसाठी सकस आहार पुरवठ्याला गती देणार – मंत्री ॲड. यशोमती ठाकूर


BY - युवा महाराष्ट्र लाइव- अमरावती |
कोरोना संकटकाळात निर्माण झालेल्या विविध अडचणींचा सामना करत शासन- प्रशासनाने विविध सुविधा व योजनांना चालना दिली. प्रभावी उपचारयंत्रणेसाठी प्रयोगशाळा, प्लाझ्मा सुविधा, कोविड केअर सेंटर उभारण्यात आले. एकीकडे कोरोना संकटाचा मुकाबला सुरू असताना पायाभूत सुविधा व महत्त्वाच्या कामांनाही चालना देण्यात आली. त्याचप्रमाणे, कुपोषणमुक्तीसाठी राज्यात सर्वत्र सकस आहार पुरवठ्याला गती देणार, असे प्रतिपादन महिला व बालविकास मंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी केले.नवराष्ट्र व नवभारत वृत्तपत्र समूहातर्फे ‘कोरोना संकटकाळात शासन- प्रशासनाचे प्रयत्न’ या विषयावर वेबिनार आज आयोजित करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. नवभारतचे संपादक धनराज गावंडे, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधीक्षक अभियंता अरूंधती शर्मा, जिल्हा माहिती अधिकारी हर्षवर्धन पवार,  नवभारतचे प्रतिनिधी त्रिदीप वानखडे, सार्वनजिक बांधकाम विभागाचे अभियंता चंद्रकांत मेहेत्रे, विभावरी वैद्य, अनिल जवंजाळ आदी यावेळी उपस्थित होते.सर्वप्रथम पालकमंत्र्यांनी महत्त्वाच्या विषयावर वेबिनार आयोजित केल्याबद्दल नवभारत वृत्तपत्रसमूहाचे अभिनंदन केले.पालकमंत्री श्रीमती ठाकूर म्हणाल्या,  कोरोनाचे संकट सर्व जगासाठी नवे होते. त्याच्या मुकाबल्यासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारली जात असतानाच विकासाची कामे सुरू ठेवणे हेही आव्हान होते. या काळात सुरुवातीला अनेक अडचणी आल्या. मात्र, शासन- प्रशासनाने अहोरात्र काम करून कामांना गती दिली. उपचारपद्धती निश्चित करण्यापासून ते स्वतंत्र कोविड रुग्णालय उभारणे, तालुका स्तरावर कोविड केअर सेंटरची उभारणी, अहवाल तपासणीसाठी स्थानिक स्तरावर प्रयोगशाळा, प्लाझ्मा यंत्रणा, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, समाजात जनजागृती अशी अनेकविध कामे सुरु असतानाच काही काळ बंद असलेल्या उद्योग- व्यवसायांना चालना देऊन रोजगारनिर्मितीसाठी विशेष प्रयत्न करण्यात आले.


No comments