web-ads-yml-728x90

Breaking News

सोन्याच्या दरात सलग सहाव्या दिवशीही वाढ...


BY - युवा महाराष्ट्र लाइव- नवी दिल्ली |
जागतिक बाजारपेठेतील तेजीमुळे भारतातील सोन्याच्या किंमतीत सातत्याने वाढ होतांना दिसत आहे. आज सलग सहाव्या दिवशी सोन्याच्या दरात झळाळी बघायला मिळाली आहे. एमसीएक्सवर ऑगस्ट सोन्याचा वायदा बाजारपेठेत 0.2 टक्क्यांनी वाढून 50,800 रुपये प्रति तोळा झाला आहे. चांदीबद्दल बोलायचे झाल्यास एमसीएक्सवर चांदीचा वायदा बाजार 0.14 टक्क्यांनी घसरून 61,110 रुपये प्रतिकिलोवर आला.मागील सत्रात भारतातील सोन्याचा दर प्रति तोळा 50,936 रुपये होता, यावर्षी आतापर्यंत भारतात सोन्यामध्ये सुमारे 30 टक्के वाढ झाली आहे.

No comments