0

BY - युवा महाराष्ट्र लाइव- कल्याण |
गुरांची चोरी करुन त्यांची कत्तल करणाऱ्या टोळीला कल्याण खडकपाडा पोलिसांनी गजाआड केले आहे. या टोळीकडून अशा प्रकारचे आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे. गेल्या काही दिवसांपासून कल्याणमध्ये गाई, म्हशी चोरी होण्याचे प्रमाण वाढले होते. कल्याण नजीक असलेल्या मोहने येथून रात्रीच्या अंधारात एका गोठ्याबाहेर बांधलेली जर्सी गाय तसेच घराबाहेर चरणारी आणखी एक गाय पकडून अज्ञात व्यक्तीने एनआरसी कंपनी बाहेरील निर्जन रस्त्याशेजारी कत्तल केल्याची घटना घडली होती.
याबाबतच्या तक्रारी खडकपाडा पोलीस ठाण्यात करण्यात आल्या होत्या. या तक्रारी नुसार पोलिसांनी या चोरट्याचा तपास सुरू केला तेव्हा खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी पोलिसांनी अफझल खान याला भिवंडी येथून तर कैज डोन याला आंबिवली कल्याण येथुन अटक केली. या दोघांनी आसपासच्या परिसरात अशा प्रकारचे गुन्हे केल्याचा संशय व्यक्त करत पोलिसांनी पुढील तपास सुरू केला आहे.

Post a comment

 
Top