0

BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
महानायक अमिताभ बच्चन यांना कोरोना झाल्यावर, त्यांना सौम्य लक्षणे असताना, इतर नागरिकांप्रमाणे त्यांना होम क्वारंटाईन का केले नाही?, त्यांचा आणि नानावटी रुग्णालयाचा संबंध काय? जास्त बिल घेणाऱ्या नानावटी रुग्णालयाला उच्च न्यायालयाने झापल्याने नानावटीची बदनामी रोखण्यासाठी अमिताभ अ‌ॅडमिट झाले का? असे अनेक प्रश्न सोशल मीडियावर उपस्थित केले जात आहेत. याबाबत पालिकेने अमिताभ यांना सौम्य लक्षणे व इतर आजार असल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आल्याचे म्हटले आहे. तर अमिताभ यांच्या प्रमाणेच सामान्य नागरिकांवरही खासगी रुग्णालयात उपचार करावेत, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे प्रकाश रेड्डी यांनी केली आहे.


Post a comment

 
Top