0

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
बालहक्कांप्रती संवेदनशील आणि सक्रिय दृष्टिकोन स्वीकारणे आवश्यक असून बालगृहातील बालकांच्या समस्यांवर मात करण्यासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज आहे, असे आवाहन महिला व बाल विकास मंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी आज केले.महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोग व इंटरनॅशनल जस्टीस मिशन (आय.जे.एम.) यांच्या संयुक्त विद्यमाने  राज्यातील बालगृहातील मुलांच्या अनुषंगाने प्रश्नोत्तर स्वरूपाच्या दोन दिवसीय वेबिनारचे आयोजन कारण्यात आले आहे. या वेबिनारच्या उद्घाटनप्रसंगी ॲड. ठाकूर बोलत होत्या. या वेबिनारमध्ये जे.जे. ॲक्ट, शिक्षण, आरोग्य या विषयाशी संबंधित प्रश्नांचा समावेश आहे.ॲड. ठाकूर याप्रसंगी म्हणाल्या, बालकांच्या समस्यांसाठी काम करणाऱ्या संस्था तसेच व्यक्तींच्या शंकांचे निरसन करण्यासाठी हे वेबिनार उपयुक्त ठरेल. अशा कल्याणकारी कामात कायदेशीर तरतुदींची माहिती असणे आवश्यक आहे. येथे उपस्थित करण्यात आलेल्या प्रश्नांवरील उत्तरे सर्वांनाच उपयुक्त ठरतील.
मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश श्री. वि. एम. कानडे उद्घाटन सत्रात म्हणाले की, बाल हक्क ही सतत चालणारी प्रक्रिया आहे. बाल न्याय अधिनियम २०१५ हा सर्वसमावेशक कायदा आहे. त्यामध्ये गुन्हेगारी न्यायिक पद्धत, मुलांची काळजी व संरक्षण, दत्तक प्रक्रिया या बाबींची स्पष्टता उत्तम पद्धतीने करण्यात आलेली आहे. तरीही त्यामध्ये काही बाबतीत आणखी जास्त काम करणे आवश्यक आहे. स्पष्टपणे मुलांच्या कल्याणासाठीचा दृष्टिकोन ठेवणे हा या कायद्याचा मूळ उद्देश आहे.


Post a comment

 
Top