0

BY - युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
पर्यावरणमंत्री तथा मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आज एमएमआर क्षेत्रातील सुरू असलेल्या विविध प्रकल्पांच्या प्रगतीबाबत एमएमआरडीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत चर्चा करुन आढावा घेतला. पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी ट्रान्स हार्बर लिंक, वेस्टर्न एक्सप्रेस हायवे आणि मल्टी ट्रान्सपोर्ट कॉमन पाससह एमएमआर प्रदेशात सुरू असलेल्या विविध कामांचा आढावा घेतला. १ हजार २७६ कोटी रुपयांच्या अंदाजित खर्चाने ३ वर्षात बांधल्या जाणाऱ्या शिवडी – वरळी एलिव्हेटेड कनेक्टरच्या कामाच्या प्रगतीवर बैठकीत चर्चा झाली. ४ लेन कॅरिजवेसह असलेले हे एलिव्हेटेड व्हायडक्ट कनेक्टर हे शिवडी रेल्वे स्थानकाजवळील रफी अहमद किडवई रोड व आचार्य दोंदे मार्ग आरओबी आणि प्रभादेवी रेल्वे स्थानकासोबत जोडणी प्रदान करेल.पालकमंत्री श्री. ठाकरे यांनी मुंबई महानगर क्षेत्रासाठी एकात्मिक तिकीट प्रणाली, एमएमआर प्रदेशात कुठेही प्रवास, टोल, पार्किंग फी, किरकोळ व्यवहार इत्यादींसाठी वापरल्या जाणाऱ्या कार्ड आधारित प्रणालीच्या प्रगतीबाबत चर्चा केली. तसेच येत्या काही वर्षात मल्टी ट्रान्सपोर्ट कॉमन पासमुळे शहर व उपनगरामध्ये व्यापक सार्वजनिक वाहतूक यंत्रणेचा वापर करून मुंबईकरांसाठी प्रवासातील अडचणी दूर होण्यास मदत होईल, असे ते म्हणाले.

Post a comment

 
Top