0

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

राज्यात दि. 1 जुलै ते दि. 26 जुलैपर्यंत 876 शिवभोजन केंद्रातून पाच  रूपये प्रति थाळी याप्रमाणे 25 लाख 11 हजार 804 गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला असल्याची माहिती अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. राज्यात   एप्रिल महिन्यात 24 लाख 99 हजार 257, मे महिन्यात 33 लाख 84 हजार 040, जून महिन्यात 30 लाख 96 हजार 232, जुलै मध्ये आतापर्यंत 25 लाख 11 हजार 804 आणि असे दि.  1 एप्रिल  ते  दि . 26 जुलै या कालावधीत एकूण 1 कोटी  14 लाख 91 हजार 333 गरीब व गरजू लोकांनी शिवभोजनाचा लाभ घेतला आहे.


Post a comment

 
Top