0

BY -मन्साराम वर्मा,युवा महाराष्ट्र लाइव- ठाणे |
भाईंदरच्या खाजगी रुग्णालयाने बिलाचे पैसे दिले नाही म्हणून कोरोनाग्रस्त महिलेचा मृतदेह तब्बल नऊ तास अडवून ठेवला. हा धक्कादायक प्रकार रविवारी (१२ जुलै) रोजी घडला आहे. कोरोनाच्या या कठीण प्रसंगात खाजगी रुग्णालयाकडून अशाप्रकारे सुरू असलेली लुटमार कधी थांबणार, अशा घटनांवर राज्यसरकार कारवाई करणार कधी हा प्रश्न उपस्थित होत आहे.भाईंदर पश्चिम उत्तनच्या भुतोडी बंदर येथे राहणाऱ्या ५९ वर्षीय महिलेस २६ जूनरोजी श्वसनाचा त्रास होत असल्यामुळे मुलगा आणि मुलीनी महिलेस भाईंदर पूर्वेच्या फॅमिली केयर रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र, अचानक रविवारी सकाळी ७ च्या सुमारास कुटुंबातील सदस्यांना रुग्णालयातून फोन आला. यात तुमच्या रुग्णाची तब्येत गंभीर असून रुग्णालयात या असे कळविण्यात आले.रुग्णाचा मुलगा आणि मुलगी रुग्णालयात सकाळी ८ वाजता रुग्णालयात दाखल झाले. त्यावेळी रुग्णालयातील व्यवस्थापनकडून रुग्णाचा मृत्यू झाला असल्याचे सांगण्यात आले."मृतदेह हवा असेल तर अगोदर २ लाख २६ हजार भरा" असेही सांगितले गेले. कुटुंबातील सदस्यांनी बिलासंदर्भात विचारपूस केली असल्यास आम्ही सांगतो असे उडवाउडवीची उत्तर रुग्णालयातून देण्यात आली. या अगोदर रुग्णालय आणि औषधाचे पावणेपाच लाख भरले आहेत. आता आणखी २ लाख २६ हजार कुठून आणणार असा सवाल कुटुंबायांनी केला. परंतु पैसे भरणार नाही तर मृतदेह मिळणार नाही असे रुग्णालयात स्पष्ट सांगण्यात आले.

Post a comment

 
Top