web-ads-yml-728x90

Breaking News

जिल्हाधिकारी यांच्या नावे फिरतोय अफवांचा मॅसेज...!

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – ठाणे |
ठाणे कलेक्टरकडून सुचना अशा शिर्षकाचा संदेश काही व्हॉट्सअप गु्रपवर आढळून येत आहे. ठाणे जिल्हाधिकाऱ्यांनी असे कुठलेही निर्देश दिलेले नाही. तसेच ठाणे जिल्हा प्रशासनाकडून अशी कुठलीही प्रेसनोट  जिल्हा माहिती कार्यालयाकडे   प्रसिद्ध करण्यासाठी दिलेली नाही.  तरी सदर संदेशामध्ये तथ्य नाही याची सर्वांनी नोंद घ्यावी.चुकीची माहिती पसरवून जनतेच्या मनात संभ्रम निर्माण करणाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येईल याची सर्वांनी नोंद घ्यावी. चुकीचा संदेश अन्य  ग्रुप वा व्यक्तींना पाठवु नये  असे जिल्हा माहिती अधिकारी ठाणे यांनी असे सुचित केले आहे.

No comments