0


महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री मा.ना.श्री. अजितदादा यांचा वाढदिवस. एकसष्ठ वर्ष पुर्ण करून बासष्ठाव्या वर्षात ते पदार्पण करत आहेतवय मुद्दामहून नमूद केले, कारण याही वयातील त्यांची स्फुर्ती, पुणे-पिंपरी चिंचवड-बारामतीला कोरोना मुक्तीसाठी भेटी, राज्याची आर्थिक परिस्थिती सावरून सगळ्यांसाठी अधिका-यांच्या सोबतच्या बैठका, सकाळी ते रात्री १० वाजेपर्यंत प्रशासकीय कामे अविरतपणे करत राहणं या गोष्टीचे आपल्याला अधिक कौतुक वाटावं
          वयाच्या साठीनंतर खरतर शांतस्वस्थपणे आपले छंद जोपासत जगाव …. पण राजकारणात हे शक्य होत नाही…. मायबाप जनता आणि तुमचे जीवाभावाचे कार्यकर्ते तुम्हाला निवृत्त होऊ देत नाहीत…. तोपर्यंत तुम्हाला कार्यरत रहावंच लागतं…. अनेक गोष्टी मनाविरूद्ध घडतात, व्यक्तिगत स्वरूपाचे आरोप केले जातात…. उद्विग्नता येते…. क्षणभर वाटत…. सोडावं हे सगळ पण सोडता येत नाही…. आदरणिय शरदचंद्रजी पवार यांच्या पावलावर पाऊल टाकून, त्यांचा आदर्श ठेवून उमेदीने कार्यरत असणारे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आपणा सर्वांचेअजितदादाहे त्याच उदाहरण.
माझे परममित्र अजितदादांना वाढदिवसाच्या मनापासून खूप खूप शुभेच्छा !
माझ्या या लेखाच्या शिर्षकातच मी अजितदादांना एक अजब रसायन म्हटलं आहे…. आणि अजब उत्प्रेरकही शाळेमध्ये रसायनशास्त्रातउत्प्रेरक या शब्दाने ओळख आपल्याला झाली आहे.  पुन्हा तो शब्द आणि त्याचा अर्थ स्मृतीपटलावर आणण्याचा प्रयत्न करू या. 
उत्प्रेरक या शब्दाला इंग्रजीतकॅटलीस्ट (Catalyst) अस म्हंटल जात. Catalyst या शब्दाचे इंग्रजी डिक्शनरीत दोन अर्थ आहेत. 
पहिला अर्थ – A Person that causes change बदल घडवून आणणारी व्यक्ती.
दुसरा अर्थ – A Substance that a chemical reaction happen faster रासायनीक प्रक्रिया वेगाने घडवून आणणारे द्रव्य, उत्प्रेरक, निदेशक.
ऑक्टोबर २०१९ पासूनच्या घडामोडी पाहिल्या तर अजितदादांना मीउत्प्रेरकका म्हणतो हे लक्षात येईल.  श्री. देवेंद्रजींना मुख्यमंत्री बनवणं, त्यांनी राजीनामा देणं, आणि मा.उद्धवजींना मुख्यमंत्री बनवणं हे सर्व बदल घडवून आणणारी पडद्यासमोरची व्यक्ती अजितदादाच आहेत.  तेव्हा वर मी नमूद केलेल्या पहिल्या अर्थाने ते उत्प्रेरक ठरतात.
दुसरा अर्थ प्रशासकीय प्रक्रिया वेगाने घडविण्या संदर्भात आहे. त्यांच्याकडे सोपविलेले विभाग हे अर्थ आणि नियोजन (Finance and Planning) आहेत.  खर तर सामान्य जनतेशी तसा या विभागाशी रोजचा संबंध नाही.  धोरणात्मक निर्णयाशी संबंधित हे विभाग.  तरीही मंत्रालयात सामान्य कार्यकर्त्यांची प्रचंड गर्दी जर कोणाकडे असेल तर ती अजितदादांकडे…. काम कोणत्याही विभागाच असो…. अजितदादांनी संबंधित विभागाचे मंत्री, अधिकारी यांना शब्द टाकलं तर ते वेगानं होत…. हा सर्वांचांच अनुभवातून आलेला, वस्तुस्थितीनिष्ठ समज…. समान्यच काय राजकीय नेते मग ते राष्ट्रवादीचे असोत वा अन्य पक्षाचे अन्य विभागाची कामे वेगाने मार्गी लावण्यासाठी मा. अजितदादांना शब्द टाकण्याची विनंती करतात…. ती फाईल त्यांच्या विभागाशी संबंधीत नसते…. पण केवळ त्यांनी टाकलेल्या शब्दामुळे प्रशासकीय प्रक्रियेला वेग येतो…. लाल फीत मोकळी होते आणि वेगाने काम होते…. तेव्हा प्रशासकीय प्रक्रिया वेगाने होण्यास प्रेरणा देणारं ते आजच्या राजकारणातलं एक सकारात्मक, आशादायीउत्प्रेरकआहे असचं म्हणाव लागेल.
त्यांचा राजकीय प्रवास, त्यांनी भुषविलेली विविध पदे, मिळविलेले विजय…. अगदी २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत पवारांना नेस्तनाबूत करण्याची भाषा करणा-यांना एक लाख पासष्ठ हजाराच्या मताधिक्याने निवडून येऊन दिलेली चपराक…. या सर्व गोष्टी महाराष्ट्राची जनता जाणते.  सबब त्या विषयी पुन्हा माहिती देण्यात मला स्वारस्य नाही.  मात्र याउत्प्रेरकाचीकाही भावलेली गुणवैशिष्टये मात्र नक्कीच आपल्या सोबत आनंदाने शेअर करावीशी वाटतात….

सौदंर्यदृष्टी असलेला स्वच्छतेचा पुजारी -
          स्वच्छता ही दादांच्या नसा-नसांत भिनलेली.  राज्यमंत्रीमंडळातील सर्व मंत्र्यांचे बंगले / कार्यालये तुम्ही पहा मी खात्रीने सांगतो सर्वात स्वच्छ, निटनेटके आणि सुबक कार्यालय आणि शासकीय निवासस्थान जर कुणाचे असेल तर अजितदादांचे…. मंत्रालय असो, बाहेरचे कार्यालय असो…. कुठेही असो चालतांना कागदाचा कपटा खाली पडलेला दिसला तर अजितदादा थांबणार, तो वाकून स्वतः उचलणार आणि जवळच्या कचरापेटीत टाकणार.  एवढ्या मोठ्या पदावर असून या माणसाला त्यात आजही कमीपणा वाटत नाही…. जीथे आपण काम करतो ती जागा स्वच्छप्रसन्न पाहिजे, ही त्यामागची भूमिका….
          लोकप्रतिनिधीने रस घेतला तर आहे त्या निधीत सुंदर वास्तू उभारता येतात. हे बारामती परिसराचा फेरफटका मारला तर दिसून येतं…. जिल्हा परिषद शाळा असो, ग्रामपंचायत कार्यालय असो, दवाखाने असोत…. त्यांची बांधकामे सुरू असताना हा माणूस सकाळी वाजता स्वतः गाडी चालवून साईटवर पोहचतो…. संबंधित अधिकारी, अभियंते, आर्किटेक्ट उपस्थित असतात…. योग्य त्या सुचना दिल्या जातात…. सकाळी ते .३० हा फेरफटका सुरू असतो…. अधिकारी बघून घेतील त्यांच त्यांच…. ही भूमिका नाही…. त्यामुळे देखण्या, सुंदर शासकीय इमारती बारामतीत उभ्या राहत आहेत.  
          महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या फोर्टमधील मुख्य कार्यालयाचं आजच्या सुंदर कार्पोरेट रूप हे अजितदादांमुळेच आहे.  एकेकाळी जुनाट फर्निचर, धुळीतलं रेकॉर्ड अस या कार्यालयाच स्वरूप…. अजितदादांनी मनावर घेतलं…. एक वर्ष हे काम सुरू होत…. आठवड्यातून एकदा अजितदादा सकाळी वाजता ह्या बँकेत असायचे…. सर्व आर्किटेक्ट, अभियंता, अध्यक्ष यांच्या भेटीसाठी…. सन्माईकचे रंग, टाईल्सचे रंग, केबीन्सची अंतर्गत सजावट या प्रत्येक गोष्टीत त्यांचा निर्णय अंतिम होता.  खर तर हा माणूस आर्किटेक्ट, इंटेरिअर डिझाईनर व्हायला हवा होता…. अस अनेक विख्यात वास्तूशास्त्रज्ञ बोलून दाखवितात…. बांधकाम, रंगसंगती, अंतर्गत सजावट या विषयीचं सर्व मुलभूत ज्ञान हा माणूस जन्मतःच घेऊन आला आहे. एखादी सुंदर वास्तू दिसली की ते त्या वास्तू रचनाकाराचा शोध घेतात…. त्याची भेट घेतात…. त्याच्याकडून सुंदर वास्तूमागील रहस्य जाणून घेतात…. पुढची एखादी वास्तू त्याने उभारायची आहे…. अस सांगूनही देतात…. सौंदर्याची अभिरूची असलेला हा जन्मजात वास्तूविशारद सुंदर वास्तू आणि बगिचे यात कथा, कवितांपेक्षा अंमल अधिकच रमत असतो.

वक्तशीरपणा
          राजकीय व्यक्तीमत्वांमध्ये अभावानेच आढळणारा गुण म्हणजे वक्तशीरपणा आहेजो दादांमध्ये आढळतो…. इतर मंत्र्यांच्या बैठका कधी सुरू होणार? याचा अंदाज घेऊन मग अधिकारी बैठकांसाठी निघतात…. मात्र अजितदादांच्या बैठकांच्या बाबतीत मात्र याची आवश्यकता नसते…. ही बैठक ठरल्यावेळी होणार ही काळ्या दगडावरची रेघ असते…. ते स्वतः कधी विलंब करत नाहीत…. आणि अकाण बैठकीस उशीर करणा-या अधिका-याला क्षमाही करत नाहीत…. त्यामुळे सर्व नियोजनबद्ध सुरू असतं….
          जे बैठकांचे तेच कार्यक्रमांच…. कार्यक्रमांना हे वेळेआधी पोहचतात…. तेव्हा व्यासपीठाची सजावट सुरू असते, रांगोळ्या काढल्या जात असतात…. हे तिथेच खुर्ची टाकून बसतात….यजमानांना फोन करतात…. १० मिनीटात कार्यक्रम सुरू करा…. मला पुढचा कार्यक्रम आहे…. कार्यक्रमाला उशीर झाला तर स्वागत, प्रास्ताविके रद्द करून सरळ मुख्य यजमान यांचे स्वतःचे भाषण असं ठरवतात. ही त्यांची वेळेवर येण्याची सवय सर्वांना माहित झाल्याने कार्यकर्ते अलिकडे सर्व वेळेवर करण्याचा प्रयत्न करतात….’दादांना कार्यक्रमाच्या ठिकाणी थोडं उशिरा आणाअशी विनंती संयोजक अजितदादांच्या स्वीय सहाय्यकांना करत असतात आणिदादांना आम्ही आणखी लवकर आणू शकतो, उशिरा नाहीअशी उत्तरे संयोजकांना मिळत असतात.
          दौ-यावर असतांनाही सकाळी वाजता हा माणूस आन्हिक, ब्रेकफास्ट आवरून जनतेच्या बेटीसाठी उपलब्ध झालेला असतो. त्यांच्या वक्तशीरपणाला खरंच सलाम!

जाहिरातबाजी जपता सामाजिक जाणिवा जपणे -
          अडीअडचणींना अनेकांना हा माणूस मदत करत असतो…. पण आयुष्यात याला त्याची जाहिरातबाजी कधी आवडली नाही…. कुणालाही ठावूक नसेल पण २६ जुलै, २००५ …. जेव्हा मुंबई पाण्याखाली बुडाली…. त्या रात्री तास हा माणूस खोपोली-पनवेलच्यामधे गाडीत अडकून होता…. त्यातही वाहूनन गेलेल्या गाडीतील प्रवाशांना तातडीने फायर ब्रिगेडची मदत उपलब्ध करून देऊन त्यांचे जीव या माणसाने वाचविलेपण याची प्रसिद्धी करणं त्यांच्या रक्तात नाही…. २६ जुलै, २००५ दादा पुण्याहून मुंबईसाठी सायंकाळी ला निघालेसोबत पोलिसांची गाडी…. मुंबईत पाऊस ही बातमी होती…. पण पोलिस म्हणाले तुम्ही पोहचाल मुंबईतलोणावळा सोडन पुढे गाडी आली आणि एक मोठा पाण्यचा लोंढा जोरात आला…. त्यात एक गाडी वाहून गेली…. गाडीतले प्रवासी गाडीतून निघून टपावर बसलेले…. पाणी वाढतच होतं…. पुर्ण अंधाराचं साम्राज्य…. त्यातही सर्वांनी गाड्याचे फ्लड लाईट सुरू करून बुडलेल्यांना धीर देण्याचा प्रयत्न सुरू केला…. दादांनी फायरब्रिगेडला फोन लावले…. काही वेळातच फायरब्रिगेड आलं…. सर्वांचे प्राण वाचले…. दादांनी फायरब्रिगेडच्या अधिका-यांचे आभार मानले…. १० तास गाडीत विना अन्न-पाणी…. त्यानंतर पुन्हा कि.मी. ची पायी पाण्यातून यात्रा करून त्यांनी चेंबुरच RCF विश्रामगृह गाठलं…. तिथे आंघोळ वगैरे आटोपून हा माणूस पुन्हा तिथून थेट मंत्रालयात बैठकीसाठी रवाना झाला…. पण याच्या बातम्या, फोटो कुठेच येणार नाहीतकार त्यात विशेष काय केल? असं त्यांच म्हणणं….
          प्रवासात कुठेही अपघात झाला असो…. यांची गाडी थांबणार…. योग्य ती मदत देवून पुढे जाणार…. -याचदा ट्रक ड्रायव्हर ट्रक दुरूस्तीसाठी चाकांना अडसर म्हणून मोठे दगड लावतात…. दुरूस्तीनंतर असे दगड बाजूला टाकायला ते विसरतात…. असे रस्त्यात पडलेले दगड आजही दिसले की, दादा गाडी थांबवतात…. बॉडीगार्डला ते दगड बाजूला टाकायला सांगतात…. रात्री एखादं वाहन वेगाने येईल आणि अपघात होईल…. तो होऊ नये म्हणून ही कृती….
          सामाजिक जाणिवा जपा, जनतेला मदत करत रहा हा वसा घेतलेला हा वारकरी…. मायबाप जनता ही याची पंढरी…. त्यामुळे देवस्थानांना भेटी नाही, देवदर्शन नाही…. त्यांचे आशीर्वादासाठी पायपीट नाही…. प्रसिद्धीच्या मागे लागता जनतेसाठी करत रहायचं…. हा मुळ स्वभाव.
          काळाची पावलं ओळखून मात्र आम्ही कार्यकर्तेच त्यांनी सोशल मिडीयावर यायचा आग्रह करत रहातो…. ते येतातही अधुनमधून…. पण फारसे रमत नाहीत…. जनता हा पांडुरंग आणि त्याची सेवा ही भक्ती…. तेव्हा त्याची जाहिरात का? असा त्यांचा सवाल…. बारामती परिसरातील ते देवस्थांनाचा जिर्णोद्धार मी केला ती जनतेची श्रद्धास्थानं म्हणून…. जनतेला आनंद झाला…. मला ते पुरेस …. मी त्या देवस्थानांना भेटी देण्यात वेळ घालवून माझा वेळ का दवडावा असा त्यांचा रोखठोक सवाल…. खरंच अजब रसायन आहे हे !

खेळावर निस्सीम प्रेम आणि खेळाडूंचा पाठीराखा
          क्रिकेटवर या माणसाचं अतिशय प्रेम…. “हुकला तो संपलाया गुणविशेषामुळे असेल. मात्र एक दिवसीय सामना असेल चुरशीचा आणि दादांच्या बैठका सुरू असल्या की दर मिनीटाला त्यांच्या सुचनांवरून एका चिठ्ठीवर स्कोअर त्यांना कळवावा लागतो…. अस म्हणतात….
          कबड्डी आणि खो-खो या खेळांना राज्यात मागील १५ ते २० वर्षात खरी संजीवनी देण्याचं काम या माणसाने केलं…. क्रिकेटप्रमाणेच कबड्डीचे सामने भव्यतेने संपन्न व्हावे, हे कबड्डी महर्षी बुवा साळवींच स्वप्न या माणसाने पुर्ण केल. कबड्डी असोसिएशनच्या शिवाजी पार्क येथील कार्यालयाच्या इमारतीला झळाळी दिली.  कबड्डी, खो-खो या खेळांच्या विकासाच्या योजनांसाठी हा माणूस निधीची कधीच कमतरता पडू देत नाही…. त्यामुळेच हे खेळ आज राज्यात विकसीत होतात.
          स्काय डायव्हिंगमधील शीतल महाजन असो, शुटींगमधल्या तेजस्वीनी सावंत असो अशा असंख्य खेळाडूंना त्या त्या टप्यावरउत्प्रेरकहोऊन दादांनी भरीव मदत केली आहे.  मंत्रालयातील पॉवरलिफ्टींगमधील महिला खेळाडू श्रीमती नर यांचा एक किस्सा…. त्या लिपिक पदावर कार्यरत…. आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेसाठी त्यांची निवड झाली…. पण ते लाख रूपये खर्च…. शासन खर्च करायला तयार नाही…. इथेही दादाउत्प्रेरकझाले…. त्या स्पर्धा खेळल्या…. सुवर्ण पदक घेवून आल्या…. त्यानंतरही त्यांनी अनेक पदकं मिळविली…. प्रत्येक वेळी त्या कौतुकाने दादांना दाखवायला यायच्या…. शासनाच्या धोरणानुसार आंतरराष्ट्रीय खेळाडूंना वर्ग-/ वर्ग- पदावर सरळ पदोन्नती देता येते….पण त्यांच कार्यालय त्यांना पदोन्नती देत नव्हतं…. त्या कार्यालयात अनुपस्थित राहतात म्हणून त्यांच्याविरूद्ध कार्यालयाने इन्क्वायरी सुरू केलेली…. दादांनी ती इन्क्वायरी बंद करायला लावली…. त्यांना पदोन्नती मिळवून दिली…. तेव्हा खेळ आणि खेळाडूंचा खंदा पाठीराखा असणारा हा खिलाडूवृत्तीचा दादा.

शब्दांचं पक्केपण -
          त्यांच्याकडे कोणतही काम घेवून जा…. त्यांच्या अखत्यारीतील असेल तरहोईल’ …. ‘होणार नाहीयापैकी एक उत्तर.  त्यांच्या विभागाशी संबंधीत नसेल तर संबंधित मंत्री/अधिकारी यांना फोन करणार…. ‘मला तरी अन्याय झाल्यासारखा वाटतो आहे…. तरी तुम्ही तपासा आणि त्वरीत कार्यवाही करा’, ‘पहातो’, ‘करतोअशी अडकवून ठेवण्याची प्रक्रिया नाही.  कारण प्रशासनातल्या दीर्घ अनुभवामुळे कामाचं स्वरूप लगेच लक्षात येतं आणि ते होण्यासारखं असूनही होत नाही म्हटल्यावर अधिका-यांची लबाडीही लक्षात येते…. अशा वेळी मात्र त्यांनी त्यांचा नेहमीचा सुर लावला खर्जातला की अधिकारीही गडबडतात, हे अनेकदा मी पाहिलं आहे.  अजितदादांकडे काम सोपवावं….त्यांनीकरतोम्हटलं की निवांतपणे घरी जावं एवढी खात्री कार्यकर्त्याला त्यांच्याविषयी आणि त्यांच्या कार्यालयाविषयी वाटते…. हेच त्यांच शब्दाचं पक्केपण आहे…. जे सर्नांना भावतं….
          असे अनेक गुण त्यांचे सांगता येतील, पण लिखाणालाही मर्यादा आहेत. तेव्हा थांबावं लागेल.
          अजितदादांच्या तापट स्वभावाविषयीही बरंचस बोललं जात…. पण आपल्या घरातही एखाद्या जबाबदा-या पडल्या की काहीवेळा चीडचीड होते…. त्यांचा रागअनाठायीनसतो, फक्त त्याचप्रमाणजास्त असतं…. कार्यकर्त्यांनाही त्यांची चूक कळत असते.  गंमतीत तर कार्यकर्ते असही म्हणतात की, ‘दादा रागवले म्हणजे काम झाले’…. कारण दादा रागवले की, थोड्या वेळाने गर्दी ओसरल्यावर त्यांना जाणवतं आपण आपल्या जीवाभावाच्या माणसांवर उगाच रागावलो…. लगेचच ते त्याला फोन करतात…. हल्लीसॉरीपण म्हणायला लागले आहेत…. त्यांच काम ऐकतात आणि करून मोकळे होतात…. तेव्हा त्यांचा राग हा कधीही अनाठायी नसतो…. हे समजून घ्यावे…. देव करो…. त्यांच प्रमाण कमी कमी होवो…. एवढच….
          आणि वाचकहो…. आपल्या कुटुंबातही एखादी साठ वर्षाची व्यक्ती असली की आपण म्हणतोच ना …. त्याचा स्वभाव आता नाही बदलणार? पण त्याने कुटूंबासाठीकेलेलं आठवू या आणि त्याला हवं तसं स्विकारू या…. त्याच्या पाठीमागे उभ राहू या!
          कार्यकर्ते मित्र आणि मायबाप जनतेला म्हणून अशीच विनंती या आपल्या नेत्याला आहे तसं स्विकारू या. त्याच्या पाठीशी उभं राहू या…. धडाडी, वक्तशीरपणा, निर्णयक्षमता, खिलाडूवृत्ती, स्पष्टवक्तेपणा हे त्यांचे गुण पाहून त्याला साथ देवू या. राज्याची विकासाची प्रक्रिया वेगाने पार पाडू शकणा-या याउत्प्रेरकालासाथ देवून प्रेरीत करत राहू या. याच त्याला शुभेच्छा ! राजकारणात कर्तृत्वाबरोबरच नशीबाचाही मोठा भाग असतो. तेव्हा अजितदादांना नशिबाची साथही भविष्यात मिळावी…. त्यांच नेतृत्व अधिक विशाल, सर्वमान्य व्हावं, ह्याच माझ्याकडून सदिच्छा!

                                 प्रमोद हिंदुराव
                              उपाध्यक्ष - महाराष्ट्र प्रेदश,
राष्ट्रवादी काँगे्रस पार्टी

Post a comment

 
Top