0

BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |

अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येप्रकरणी अभिनेत्री रिया चक्रवर्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुशांतच्या वडिलांच्या तक्रारीनंतर हा गुन्हा दाखल केला आहे. बिहारच्या पाटण्यातील राजीव नगर पोलीस ठाण्यात या गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. “रियाने सुशांतकडून पैसे घेतले आणि त्याला आत्महत्या करण्यास भाग पाडले,” असा आरोप सुशांतचे वडिल के. के. सिंह यांनी केला आहे.

सध्या सुशांत सिंहच्या आत्महत्येचा मुंबई पोलीस तपास करत आहेत. मात्र मुंबई पोलिसांच्या तपासावर मला विश्वास नाही, असे सुशांतच्या वडिलांचे म्हणणं आहे. त्यामुळे त्यांनी पाटणा पोलिसांना याबाबतची चौकशी करण्याची विनंती केली आहे.


Post a comment

 
Top