‘रेडक्रॉस’च्यावतीने होमिओपॅथी औषधे पालकमंत्र्यांच्या हस्ते वितरित
BY - युवा महाराष्ट्र लाइव- अकोला |
येथील रेडक्रॉस या
सेवाभावी संघटनेच्यावतीने प्रत्येक तालुक्यात मोफत वाटपासाठी होमिओपॅथी औषधाचे
वितरण राज्याचे जलसंपदा व लाभ क्षेत्रविकास,शालेय शिक्षण, महिला व
बालविकास इतर मागासवर्ग, सामाजिक व शैक्षणिक मागास प्रवर्ग, विमुक्त
जाती, भटक्या जमाती आणि विशेष मागासप्रवर्ग कल्याण, कामगार राज्यमंत्री
तथा अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री ओमप्रकाश ऊर्फ बच्चू कडू यांच्या हस्ते वितरित
करण्यात आले.याप्रसंगी विभागीय
आयुक्त पियुष सिंह, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, जिल्हा परिषदचे मुख्य
कार्याकारी अधिकारी सौरभ कटियार, जिल्हा पोलिस अधिक्षक जी. श्रीधर, निवासी
उपजिल्हाधिकारी संजय खडसे आदी उपस्थित होते. यावेळी रेडक्रॉस तर्फे राबविण्यात
आलेल्या कोविड-१९ च्या उपाययोजनाबाबत राबविण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती
देणाऱ्या पुस्तिकेचे विमोचनही ना. कडू यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी रेडकॉस
अकोला शाखेचे उपाध्यक्ष प्राचार्य डॉ. किशोर मालोकार, सचिव प्रभाजितसिंह बछेर
उपस्थित होते.
No comments