web-ads-yml-728x90

Breaking News

दै. दिव्य मराठीचे संपादक, पत्रकारांवरील गुन्हे, ती प्रशासनाची चूकच: गृहमंत्री अनिल देशमुख


BY - आज्ञानसिंग चव्हाण,युवा महाराष्ट्र लाइव – सोयगाव,औरंगाबाद  |
औरंगाबाद शहरातील २०६ कोरोनाग्रस्त नागरीकांच्या मृत्यूला कारणीभूत कोण? असा प्रश्न बातम्यांच्या माध्यमातून विचारताच खवळलेल्या महसुली आणि पोलीस प्रशासनाने दै दिव्य मराठीच्या संपादक आणि वार्ताहर यांच्यावर गुन्हे दाखल करून प्रसार माध्यमांची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न केला होता.  यावरून संपूर्ण जिल्हाभरातील माध्यमासह विविध क्षेत्रातून संताप व्यक्त करून निषेध नोंदवला होता. झालेल्या प्रकाराची दखल केंद्रीय पत्रकार संघाने घेत थेट गृहमंत्र्यांना दिलेल्या पत्रातून मागणी करताच पत्राची दखल घेत शुक्रवारी (ता. ३ जुलै) रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सचिन बोंबले यांना संपर्क साधून झालेला प्रकार चुकीचा होता, प्रशासनाची ती चूकच झाली, मी महासंचालक आणि पोलीस आयुक्तांना संबंधितांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.
दैनिक दिव्य मराठीच्या संपादक तसेच पत्रावरील गुन्हे तात्काळ मागे घ्या अशी पत्राद्वारे मागणी केंद्रीय पत्रकार संघाच्या वतीने राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ता. २ जुलै रोजी केली होती. त्याची तात्काळ दखल घेत दस्तुरखुद्द गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केंद्रीय पत्रकार संघाला मोबाईल वरून संपर्क साधून झालेल्या प्रकारा बद्दल खेद व्यक्त केला आहे. दै.दिव्य मराठी हे औरंगाबादेतील आघाडीचे वृत्तपत्र आहे, या वृत्तपत्राने नेहमीच प्रशासनाला व सरकारला लोकहिताच्या निर्णयात साथ देणारी भूमीका घेतली आहे. या वृत्तपत्राने शहरातील २०६ कोरोनाग्रस्त नागरीकांच्या मृत्यूला कारणीभूत कोण? या आशयाचे वृत्त प्रसिध्द केले होते. यावर आत्मपरीक्षण न करता प्रशासनाने चवताळून  दैनिकाच्या संपादक व पत्रकाराविरुध्द गुन्हे दाखल केले. प्रशासन वृत्तपत्र स्वातंत्र्यावर आक्रमण करीत आहे. माध्यमाच्या स्वातंत्र्यावर गदा आणून पत्रकारांची गळचेपी करण्याचा प्रयत्न करत आहे. पत्रकारांचा आवाज दाबला जात आहे. प्रशासनाने ताबडतोब गुन्हे मागे घ्यावेत. थेट गुन्हे दाखल करण्याची प्रशासनाची भूमीका अन्यायकारक आहे, दाखल झालेले गुन्हे मागे घेतले जावेत. अशी मागणी केंद्रीय पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप कासालकर यांच्या आदेशाने राष्ट्रीय उपाध्यक्ष कमलेश गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली औरंगाबाद जिल्हा कार्यकारिणीचे जिल्हाध्यक्ष सचिन बोंबले, जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ कांबळे, प्रा. आबासाहेब कसबे, वैजापूर तालुकाध्यक्ष संजय पगारे, तालुका कार्याध्यक्ष प्रा. सचिन कुमावत, मुख्य तालुका मुख्य महासचिव सौरभ लाखे, उपाध्यक्ष सुधीर बागुल, तुषार पवार आदींनी केली होती
गृहमंत्री ना. अनिल देशमुख  यांनी केंद्रीय पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष औरंगाबाद सचिन बोंबले यांच्याशी फोनवर संपर्क करून दिव्य मराठी'च्या पत्रकारावर व संपादक आवर दाखल केलेले गुन्हे मागे घेण्यासंदर्भात पोलिसांना निर्देश दिल्याचे माहिती दिली
 शुक्रवारी (ता. ३ जुलै) रोजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी औरंगाबाद जिल्हाध्यक्ष सचिन बोंबले यांना संपर्क साधून झालेला प्रकार चुकीचा होता, प्रशासनाची ती चूकच झाली, मी महासंचालक आणि पोलीस आयुक्तांना संबंधितांवरील गुन्हे मागे घेण्याचे आदेश दिले असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.

No comments