web-ads-yml-728x90

Breaking News

ट्विटर खात्यांच्या हॅकिंगबद्दल सावध राहा – महाराष्ट्र सायबरचे आवाहन


BY -  युवा महाराष्ट्र लाइव- मुंबई |
सध्या लॉकडाऊनच्या काळात सायबर गुन्हेगारांनी ट्विटर अकाउंट हॅकिंगबाबत एक नवीन प्रकारचा गुन्हा करण्यास सुरवात केली आहे. काही जगप्रसिद्ध व्यक्ती जसे की, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बाराक ओबामा, बिल गेट्स, जेफ बेझो, उबेर व ॲपल कंपन्यांची ट्विटर अकाउंट्स हॅक केली आहेत गेली आहेत. तसेच वरील व्यक्तींच्या नावाचे ट्विट पाठवून काही ठराविक रक्कम इनाम म्हणून पण जाहीर करण्यात आली आहे.    तसेच हॅक झालेल्या अकाउंट्स वरून काही फेक लिंक्स पण टाकण्यात आल्या होत्या ज्या अन्वये सायबर भामट्यांच्या खात्यात साधारणपणे १.२ लाख डॉलर किमतीच्या बिटकॉईन्स जमा करून घेतल्याचा अंदाज आहे. अशा बातम्या सर्व समाज माध्यमांवर फिरत आहेत.हा सर्व प्रकार साधारणतः भारतीय प्रमाण वेळेनुसार १६ जुलै २०२० च्या मध्यरात्री ०१:३० वाजता घडला व त्यामुळे ट्विटरचे काही features व सोयी काही ठराविक काळाकरिता उपलब्ध नव्हत्या. ट्विटर support नी सदर प्रकार ओळखून याबाबत योग्य उपाय योजना व तांत्रिक खबरदारी घेऊन सदर प्रकार अजून जास्त प्रमाणात वाढण्यापासून थांबविला.

No comments