0

BY - आज्ञानसिंग चव्हाण,युवा महाराष्ट्र लाइव - सोयगाव |
जामनेर तालुक्यातील देऊळगाव गुजरी येथील 29 वर्षे पुरुष आणि 23 वर्षीय महिला एकाच घरातील दोन व्यक्ती असून यांचे 1/7/ 2020 रोजी स्लॅब तपासणीसाठी पाठविले असताना 4/7/2020  रोजी त्यांचे अहवाल प्राप्त झाले असून त्यांना कोरोनाची लागण झालेली दिसून आली होती त्यानंतर त्यांना तालुक्याच्या ठिकाणी कोवीड केअर सेंटर जामनेर येथे भरती करण्यात आले होते या दोघांनी मात्र सातव्या दिवशी कोरोनावर मात करून त्यांना डॉक्टरांच्या सुचनेनुसार सुट्टी देण्यात आली आणि ते गावात पोहोचता बरोबर त्यांचे स्वागत करण्यात आले आहे यावेळी ग्रामपंचायत कर्मचारी व्यापारी मंडळी पत्रकार बंधु आणि ग्रामस्थ  हजर होते हे आनंदमय वातावरण पाहून देऊळगाव व परिसरातील सर्व जनतेमध्ये दिलासादायक वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे व आता आपला परिसर कोरोना मुक्त झाल्याचा आनंद जनतेच्या मनात दिसून येत आहे

Post a comment

 
Top