0

BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – पडघा,ठाणे |
ठाणे जिल्हयातील भिवंडी,पडघा परिसरात कडक लॉकडाऊन कालावधीत पडद्या बाजारपेठ बंद आहे.लॉकडाऊन कालावधीत मुसळधार पाऊस पडल्याने आतकोली भादाणे नदी नाल्यावर मच्छीमारी खवयांची जत्रा भरली होती.मच्छीमारी खवय वाडा शहापुर कल्याण ठाणे भिवंडी परिसरातुन पागेरे जाळे घेवुन आलीशान मोटारीने काही टुव्हीलर गाडीने आतकोली भादाणे नदीवर मच्छीमारी साठी आले होते त्यांना पडद्या पोलिसानी दंडुक्याचा प्रसाद देवुन कारवार्इ केली.अनेकांचे पागेरे पाण्यात टाकले गेले तसेच वाहानाची जाग्यावरच हवा काढुन कारवार्इ केल्याने पोलिसांचे कौतुक होत आहे.गेल्या वर्षी याच ठिकाणी मासेमारीसाठी आलेल्या दोद्यांचा मृत्यु झाला होता त्यांचा मृत्युदेह काही दिवसानी पिसा डॅम धरणाच्या नदीपात्रात सापडल्याने यावर्षी पडद्या पोलिसांनी दक्षता घेवुन मुसळधार पावसात खोलपाण्यात मासे मारी करणार्‍यावर कठोर कारवार्इ केली आहे.पिसेडॅम धरणाच्या नदीपात्र प्रचंड मोठा असल्याने वळगणीचे मासे मोठया प्रमाणात आतकोली नदीला ओळाला लागतात शेतात जातात त्यामुळे या परिसरात खवयांची पाऊस पडल्यावर मोठी गर्दी होत आहे.मात्र पडद्या पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस अधिकारी पोलिस निरिक्षक पोलिस उपनिरिक्षक कर्मचार्‍यांनी चांगली कामगिरी केली आहे.

Post a comment

 
Top