web-ads-yml-728x90

Breaking News

राज्यात कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५६ टक्क्यांवर


BY - युवा महाराष्ट्र लाइव- उल्हासनगर |
राज्यात आज ५७१४ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ५५.९९ टक्के असून आतापर्यत एकूण संख्या १ लाख  ९९ हजार ९६७ झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या ९६१५ नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात १ लाख ४३  हजार ७१४  रुग्णांवर (ॲक्टिव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. राज्यात नोंद झालेले  २७८  मृत्यू हे मुंबई मनपा-५४, ठाणे-४, ठाणे मनपा-७, नवी मुंबई मनपा-१०,कल्याण-डोंबिवली मनपा-१३, उल्हासनगर मनपा-४, भिवंडी निजामपूर मनपा-२, मीरा-भाईंदर मनपा-१६, वसई-विरार मनपा-४, पालघर-२,रायगड-१०, पनवेल मनपा-४, नाशिक-१, नाशिक मनपा-१०, अहमदनगर-२, अहमदनगर मनपा-१, धुळे- १, जळगाव-९, जळगाव मनपा-१, नंदूरबार-१, पुणे-८, पुणे मनपा-४९, पिंपरी-चिंचवड मनपा-१७, सोलापूर-५, सोलापूर मनपा-४, सातारा-३, कोल्हापूर-४, कोल्हापूर मनपा-३, रत्नागिरी-२, औरंगाबाद-१, औरंगाबाद मनपा-४, जालना-३, हिंगोली-१, परभणी-२, परभणी मनपा-१, लातूर मनपा-२, उस्मानाबाद-३, बीड-२, नांदेड-३, नांदेड मनपा-१, यवतमाळ-१,नागपूर मनपा-२ या जिल्हा आणि मनपा क्षेत्रातील तर इतर राज्य १ अशी नोंद आहे.No comments