0

BY - संतोष पिलके,युवा महाराष्ट्र लाइव - चिपळूण |
संपूर्ण कोकणात सुमारे दोनशे कोरोना रुग्णावर यशस्वीरीत्या गुणकारी ठरलेल्या आयुर्वेद औषधाची निर्मिती करणाऱ्या चिपळूणच्या अनुपमा अमोल कदम यांचा शुक्रवारी चिपळूणचे माजी सभापती शौकत मुकादम यांनी रोपटे देऊन सत्कार केला,अनुपमा कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नुकतीच आमदार शेखर निकम यांची भेट घेतली होती या वेळी आ.निकम यांनी संपूर्ण माहिती घेऊन आपण या बाबत आरोग्य मंत्री ना . राजेश टोपे यांची भेट मिळून देऊ असे सांगितले,त्यामुळे आ.निकम यांच्या प्रयत्नामुळे आरोग्य मंत्रालय महराष्ट्र सरकार यांचे अनुपम कदम यांना सहकार्य मिळणार आहे,
कोरोना रोगावर रुग्णांना लाभदायक ठरत असलेल्या आयुर्वेदीक औषधांची अनुपमा कदम यांनी निर्मिती केली आहे अशी माहिती मला चिपळूणमध्ये अनेक ठिकाणी लोकांच्या चर्चेतून मिळाली . म्हणून मी स्वतः अनुपम कदम यांच्या आयुर्वेद कार्यालयास भेट देण्याचे ठरविले,पवन महान्यूज या औषध निर्मितीसोबत कदम कुटुंबीय आणि त्यांचे सहकारी यांची शासनदरबारी सर्व प्रकारच्या कागदपत्रांची पूर्तता करण्याची प्रक्रिया अंतिम टप्यात आली आहे ,शिवाय अनेक कायदेशीर बाबी पूर्ण झाल्या आहेत, याची मी खातरजमा केल्यानंतर येथे भेट देण्याचे ठरवले .कोरोना आजारावर गुणकारी ठरणाऱ्या  औषधाची निर्मिती चिपळूण मधून होत असल्यामुळे संपूर्ण कोकणात आणि राज्यात चिपळूणचे नाव उंचविण्याचे काम अनुपमा कदम यांनी केले आहे , आयुर्वेद क्षेत्रात अनुपमा कदम यांची कामगिरी उल्लेखनीय आहे अशी प्रतिक्रिया चिपळूण पंचायत समितीचे माजी सभापती शौकतभाई मुकादम यांनी दिली,शुक्रवारी मुकादम यांनी येथे भेट देऊन अनुपम कदम आणि त्यांच्या सहकाऱ्यांचा रोपटे देऊन सत्कार केला.या वेळी सामाजिक कार्यकर्ते दत्ता पवार,तात्या सकपाळ,अमोल कदम आदिल मुकादम, विकास गमरे,अखत्तार मुकादम आदी मान्यवर उपस्थित होते,
आयुर्वेदामधून आरोग्यविषयक काहीतरी चांगले निर्माण करण्याच्या एकमेव इर्षेने आयुर्वेद क्षेत्रात आपण गेली १३ वर्ष करीत असलेली अथक परिश्रमला आज खऱ्या अर्थाने यश मिळाले असल्याचे सांगून कोरोना या महाभयंकर रोगावर आपण तयार केलेले औषध संपूर्ण कोकणातील दोनशे रुग्णावर गुणकारी ठरले आहे,अशी माहिती आयुर्वेद तज्ञ अनुपमा अमोल कदम यांनी दिली,भाभा अणुशक्ती केंद्र,मुंबई,येथील सुमारे २५ रुग्ण, तसेच ठाणे सिव्हिल हॉस्पिटल,पुणे,जुईनगर सानपाडा,मुंबई,विरार,बदलापूर,
वसई, डोंबिवली,यसह अनेक ठिकाणी आम्ही औषध वेळच्या वेळी पोच केली यातून सुमारे दोनशेहून अधिक कोरोना पेशंट बरे झाले असल्याची माहिती अनुपमा कदम यांनी दिली,
पवन महान्यूज चिपळूण
आपण तयार केलेले आयुर्वेद औषध केवळ कोरोना आजारापूरती मर्यादित नसून 
हार्ड ब्लॉकेज
कोरेस्ट्रॉल
 युरिक ऍसिड
शुगर
संधिवात
झोप न येणे
डोळ्यांचे आजार
 मणका आजार
मोतीबिंदू
यासह अनेक आजाराचे रुग्ण ठणठणीत बरे झाले असल्याचे सांगून संपूर्ण महाराष्ट्रातुन आमच्या विविध औषधांना चांगली मागणी असल्याचे अनुपमा अमोल कदम यांनी सांगितले,या बाबत कदम यांनी खेड दापोली मंडणगड चे माजी आमदार संजयराव कदम यांची काही दिवसांपूर्वी भेट घेऊन औषधांचे महत्व पटवून दिले,या वेळी माजी आ.कदम यांनी आपले संपूर्ण सहकार्य मिळेल असे आश्वासन दिले,Post a comment

 
Top